प्रेयसीवर बलात्कार करुन काढला व्हिडिओ, निलंबित पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:46 PM2018-03-24T23:46:11+5:302018-03-24T23:46:11+5:30
पुणे पोलीस दलाची प्रतिमा खराब केल्याचा ठपका ठेवून सुमारे दहा दिवसांपूर्वी निलंबित केलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचा-याविरुद्ध अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी पटेल या महिलेला देत होता.
पुणे : पुणे पोलीस दलाची प्रतिमा खराब केल्याचा ठपका ठेवून सुमारे दहा दिवसांपूर्वी निलंबित केलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचा-याविरुद्ध अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी पटेल या महिलेला देत होता.
असिल कादर पटेल (रा.भवानी पेठ पोलीस लाईन), सनी सुरेश डिंबर (रा. म्हाडा कॉलनी, शाहु कॉलेज रोड) आणि चिराग त्रिवेदी (म्हाडा कॉलनी, दत्तवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २००९ पासून सुरु होता. एका पार्टीमध्ये या महिलेची असिफ पटेल याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी त्याने आपण एचबीसी येथे रिकव्हिरी अधिकारी असल्याचे सांगितले.
पटेल याने या महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व त्याची व्हिडिओ क्लिप काढून ती सोशल मिडियावर व्हायरल करतो, असे सांगून पुन्हा वेळोवेळी शारिरीक संबंध करु धमकी दिली. या महिलेकडून पैसे घेऊन गेला. या महिलेच्या पतीला तिच्या जातीविषयी तिरस्कार निर्माण केला. तेव्हा तिच्या पतीने ही महिला व तिच्या घराच्याविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. असिफ पटेल याने काढलेला व्हिडिओ चिराग त्रिवेदी याने पॉर्न साईटवर अपलोड केला. असिफ पटेल हा कॉलगर्ल सप्लाय, गांजा, कोकीन व इतर बेकायदेशीर कामे करीत असून हुक्का पार्लरचे हप्ते जमा करीत असल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या महिलेच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी बलात्कारासह माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अनुसुचित जाती जमामी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील अधिक तपास करीत आहे.