VIDEO : खळबळजनक! शेततळ्यात टाकलं विषारी औषध; सहा ते सात टन माशांचा मृत्यू; इंदापूरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:00 PM2021-08-11T19:00:38+5:302021-08-11T19:04:22+5:30
खळबळजनक! शेततळ्यात टाकलं विषारी औषध; सहा ते सात टन माशांचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील घटना; शेतकर्याचे दहा ते बारा लाखांचं नुकसान.
बाभुळगाव : इंदापूर तालुक्यातील पळसदेव शेलार पट्टा येथील शेतजमीनीवर एक एकर क्षेत्रात मत्स्य तळ्यात विषारी औषध टाकल्याने रूपचंद जातीचे सहा ते सात टन वजनाचे जिवंत मत्स्यबीज मरून गेल्याने संबधीत शेतकर्याचे दहा ते बारा लाख रूपयांचं नुकसान झाले असल्याबाबतची फिर्याद संजय एकनाथ शेलार (वय ५२, रा.पळसदेव,ता.इंदापूर,जि.पुणे यांनी संशयित व्यक्तीविरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
सुरेश विश्वनाथ शेलार (रा.पळसदेव, ता.इंदापूर,जि.पुणे) असे संशयित आरोपीचे नाव असून तो फिर्यादी यांचा चुलत भाऊ आहे. त्यांच्यात शेतजमिनीच्या कारणावरून जुना वाद आहे. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा शेततळे पार्टनर संतोष लक्ष्मण नगरे हे मत्स्यबीज तळ्याची पाहणी करण्यासाठी शेतात गेले असता वरील संशयित आरोपीने फिर्यादीशी वाद घालत त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपीने ७ ऑगस्ट पुन्हा नगरे यांच्या घरासमोर जात त्यांना शिवीगाळ केली.त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी फिर्यादी हे शेततळे पाहण्यासाठी गेले असता तळ्यातील सर्व मत्स्यबीज मृृृृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसुन आले. हे कृृृत्य हे फिर्यादींचा चुलत भावानेच केले असल्याचा संशय आल्याने याबाबतची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.