Video: कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास; वेल्हे तालुक्यातील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 07:50 PM2023-07-31T19:50:31+5:302023-07-31T19:51:23+5:30
गराेदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना पूल नसल्याने आजारी पडल्यावर झाेळीत टाकून उचलून आणावे लागते
वेल्हे: वेल्हे तालुक्यातील घिसर ते हिरवेवस्ती कानंदी नदीवर पूल नसल्याने वेल्हे तालुक्यातील घिसर येथील हिरवेवस्ती येथील शाळेतील मुलांना गुडघाभर पाण्यातून धाेकादायक रित्या प्रवास करून शाळेत जावे लागत आहे. अनेकदा पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह तीव्र असताे त्यामुळे दाेन ते तीन महिने मुलांना घरीच बसावा लागतं आहे. येथील गराेदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना रस्ता आणि पुल व कुठल्याही प्रकारची साेय नसल्यामुळे आजारी पडले तरी त्यांना झाेळीत टाकून उचलून आणावे लागते.
वेल्हे तालुक्यातील घिसर परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असून गावच्या वरच्या बाजूला धनगर समाजाचे तीन-चार वस्त्या आहेत. हिरवे वस्ती ते घिसर दाेन ते तीन किलाेमीटर अंतर आहे. जिल्हा परिषदेची शाळा घिसरमध्ये असल्याने येथील स्थानिक विद्यार्थ्यांना दाेन ते तीन किलाेमीटर अंतर डाेंगरदऱ्यातून, चिखल, काट्यातून रस्ता काढून पावसातून जावे लागत आहे. या परिसरात हिस्त्र प्राण्यांचा वावर असताे, तर येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी ग्रामस्थ दरराेज विद्यार्थ्यांना नदी पार करून अंगा खांद्यावर घेऊन जातात. येथील विद्यार्थ्यांना नियमितपणे जीव धाेक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शासनाकडे पूल बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. शासनाने अनेक वर्षापासून याकडे दुर्लक्ष केले आहे. तरी आजपर्यंत पाठपुरावा करूनही ग्रामस्थांच्या पदरी निराशाच पडली आहे.
कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास, वेल्हे तालुक्याच्या हिरवेवस्ती येथील स्थिती #pune#velhe#schoolpic.twitter.com/W6zq6Mylb4
— Lokmat (@lokmat) July 31, 2023
ज्या ठिकाणी पूल मंजूर आहे त्याच ठिकाणी पूल व्हावा. जवळच समशान भूमी असून यासाठीही रस्त्याची साेय नाही. अनेक वर्षे संबंधित विभागाकडे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे गरोदर महिला, लहान मुले यांच्या जीवाचा तरी विचार करावा अशी खंत लक्ष्मण हिरवे, माराेती हिरवे, भरत हिरवे, अंजना हिरवे, साेनाबाई हिरवे, दगडाबाई हिरवे, रेणुका हिरवे, सीताबाई हिरवे, दशरथ हिरवे, रामभाऊ हिरवे, भागु हिरवे, रमाबाई हिरवे, सुनिता हिरवे, अनिता हिरवे यांनी व्यक्त केली.