VIDEO : हातात तिरंगा, नाचवला अन् भिरकावला; पुण्यात गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 07:29 PM2023-08-14T19:29:20+5:302023-08-14T19:40:11+5:30
पुणे पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत त्या गायिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : पुण्यातील एका क्लबमध्ये गायिकेने नाचता नाचता तिने केलेल्या कृत्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये गायिकेकडून तिरंग्याचा अवमान झाल्याची घटना घडली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या कार्यक्रमात या गायिकेने दोन हाता दोन ध्वज घेतले होते. गाणे म्हणत ते ध्वज ती दोन्ही हाताने फिरवत होती. शेवटी तिने ते दोन्ही ध्वज प्रेक्षकांमध्ये फेकून दिले. त्यामुळे पुणे पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत त्या गायिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गायिका उमा शांती उर्फ शांती पिपल विरोधात गुन्हा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. स्टेजवर डान्स करत असताना दोन्ही हातात तिरंगा घेऊन प्रेक्षकात फेकला. त्यानंतर हातवारे करून असभ्य वर्तन केल्याची तक्रार तिच्याविरोधात दाखल झाली आहे. राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेचा भंग करून अवमान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला घडला प्रकार घडल्याने नेटकऱ्यांनी त्या गायिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
Pune : हातात तिरंगा, नाचवला अन् भिरकावला; पुण्यात गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल#IndependenceDay2023pic.twitter.com/dRkfEQzGUV
— Lokmat (@lokmat) August 14, 2023