सोशल मीडियावर तलवार घेऊन व्हिडीओ व्हायरल करणे आले अंगाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:01+5:302021-07-05T04:08:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियावर कोयते, तलवार, पालघन अशी हत्यारे हातात घेऊन व्हिडीओ बनवून व्हायरल करून दहशत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोशल मीडियावर कोयते, तलवार, पालघन अशी हत्यारे हातात घेऊन व्हिडीओ बनवून व्हायरल करून दहशत निर्माण करणा-या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने अटक केली आहे.
नितीन सुंदर दहीरे (वय २२, रा. नवीन म्हाडा बिल्डिंग, हिंगणे मळा, हडपसर), अनिकेत अशोक कुंदर (वय २२, रा. ससाणेनगर, हडपसर) आणि कुणाल मोहन जाधव (वय २१, रा. गायरान झोपडपट्टी, वाघेश्वरनगर, वाघोली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकातील पोलीस अंमलदार हृषीकेश टिळेकर व शेखर काटे यांना तलवार व पालघन हातात घेऊन व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केले दोघे हिंगणे मळा येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नितीन दहिरे व अनिकेत कुंदर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पालघन व तलवार मिळून आली. हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अंमलदार हृषीकेश ताकवणे व हृषीकेश व्यवहारे यांना पालघन हातात घेऊन व्हिडीओ व्हायरल करणारा वाघोली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुणाल जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पालघन जप्त केली असून लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे, हृषीकेश ताकवणे, हृषीकेश व्यवहारे, सचिन पवार, हृषीकेश टिळेकर, नितीन धाडगे, शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.