VIDEO | पुण्यात भरदिवसा सीएनजी पंपावर तरुणांचा राडा; नागरिकांत घबराटीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 13:04 IST2022-05-21T13:01:53+5:302022-05-21T13:04:02+5:30
पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण...

VIDEO | पुण्यात भरदिवसा सीएनजी पंपावर तरुणांचा राडा; नागरिकांत घबराटीचे वातावरण
धायरी: सीएनजी पंपामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा राग मनात धरून काही तरुणांनी थेट पंपावरील कर्मचाऱ्यालाच मारहाण केली. तसेच पंपावर दगडफेक करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नऱ्हे भागात असणाऱ्या युवांश गॅस स्टेशन या नावाच्या सीएनजी पंपावर घडला.
मिळालेली माहिती अशी की, नऱ्हे भागातील युवांश गॅस स्टेशन या पंपावर सीएनजी भरण्यासाठी रोज वाहनांची गर्दी असते. त्यामुळे परिसरात रोजच वाहतूक कोंडी होते. याच वाहतूक कोंडीवरून एका तरुणाने तेथील कर्मचाऱ्याला याबाबत विचारले. यामध्ये दोघांत वाद निर्माण झाला. त्यानंतर त्या तरुणाने आणखी आठ - दहा तरुणांना बोलावून त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. यात त्या कर्मचाऱ्याच्या कानाला जखम झाली आहे.
पुण्यात भरदिवसा तरूणांचा राडा; पंपावरील कर्मचाऱ्याला केली मारहाण#crime#punepic.twitter.com/wmoUarjb9z
— Lokmat (@lokmat) May 21, 2022
याबाबत माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या संपूर्ण घटनेचे सीसीटिव्ही फुटेज तपासत आहेत. मात्र भरदिवसा तरुणांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.