Vidhan Sabha 2019 : कसब्यावरचा झेंडा कायम राहणार का..? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:59 AM2019-10-02T06:59:59+5:302019-10-02T07:00:11+5:30

कसब्यात शिवसेनेकडून होत असलेली बंडखोरी ही आणखी एक लक्षणीय बाब आहे..

Vidhan Sabha 2019 : Will the flags on Kasba constituency..? | Vidhan Sabha 2019 : कसब्यावरचा झेंडा कायम राहणार का..? 

Vidhan Sabha 2019 : कसब्यावरचा झेंडा कायम राहणार का..? 

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपाचा बालेकिल्ला सर करणारच याचा विश्वास

पुणे : भारतीय जनता पार्टीने  महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देऊन कसबा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आता अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची उत्सुकता असून त्यावरून या मतदारसंघात चुरस होईल किंवा नाही हे ठरणार आहे. 
उमेदवारीबाबत बोलताना मुक्ता टिळक म्हणाल्या, पक्षाने मी आतापर्यंत केलेल्या कामाचे चीज केले अशी भावना झाली आहे. त्याप्रमाणे यातून टिळक घराण्याचाही मान ठेवण्यात आला आहे. सलग ४ वेळा मी या भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. महापौर म्हणून गेली अडीच वर्षे काम केले. त्या सगळ्याचा उपयोग निश्चितपणे होईल अशी खात्री आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले असून भाजपाचा बालेकिल्ला सर करणारच याचा विश्वास आहे.
टिळक यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर झाली असली तरी अद्याप अन्य पक्षांचे, त्यातही आघाडीमध्ये काँग्रेसकडे आलेल्या या मतदारसंघातील त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. पक्षाचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे तसेच पालिकेतील काँग्रेसचे सहयोगी सदस्य रविंद्र धंगेकर असे तिघेजण काँग्रेकडून इच्छुक आहेत. त्यातील धंगेकर यांनी आतापर्यंत दोन वेळा याच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. शिवाय ते स्थानिक रहिवासी आहेत. उमेदवारीसाठी त्यांचे पारडे जड असल्याचे बोलले जाते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे या इच्छुक आहेत. पक्षाकडून त्यांचेही नाव अद्याप जाहीर झालेले नाही. कसब्यात शिवसेनेकडून होत असलेली बंडखोरी ही आणखी एक लक्षणीय बाब आहे. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी स्वत:च आपली उमेदवारी जाहीर करत प्रचारही सुरू केला आहे. शिवसेनेला भाजपाने पुण्यात विधानसभेची एकही जागा सोडली नसल्याचा निषेध म्हणून निवडणूक लढवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुण्यातील सर्व शिवसैनिक कसबा मतदारसंघावर भगवा फडकवतील असे ते म्हणाले. .........................................................................................................................................................................................................................................
                                                                                                                                 

Web Title: Vidhan Sabha 2019 : Will the flags on Kasba constituency..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.