तरुणांच्या दक्षतेने परदेशी पाहुण्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:37+5:302021-02-15T04:10:37+5:30
हिवाळ्यात विशेषतः नदीकिनारी, डोंगराळ भागात परेदशी पक्ष्यांचा ठिकाणा आपल्याला पाहण्यास मिळत असतो. लाखो किलोमीटर अंतरावरून हे पक्षी मार्गक्रमण करून ...
हिवाळ्यात विशेषतः नदीकिनारी, डोंगराळ भागात परेदशी पक्ष्यांचा ठिकाणा आपल्याला पाहण्यास मिळत असतो. लाखो किलोमीटर अंतरावरून हे पक्षी मार्गक्रमण करून येत असल्याने त्यांना पाहण्यासाठी नेहमीच पक्षीप्रेमींची गर्दी होत असते. या पक्ष्यांमधीलच वोली नेक्ड स्टोर्क नावाचा पक्षी देखील दूर अंतरावरून आपल्याकडे येत असतो.
आळंदी म्हातोबा येथे शुक्रवारी महेश जवळकर, सचिन क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य पारस वाल्हेकर, गोकुळ क्षीरसागर, अथर्व जवळकर हे आपल्या शेताकडे जात असताना त्यांना दगडांमध्ये हा पक्षी जखमी अवस्थेत आढळला. वेगळ्याच प्रजातीचा पक्षी दिसत असल्याकारणाने त्यांनी वनविभागाला याबाबतीत कल्पना दिली. वनविभागाचे अधिकारी म्हस्के यांनी त्वरित सर्पमित्र रमेश हरिहर यांना घटनास्थळी पाठवले. तसेच पुणे येथील अॅनिमल रिस्क्यू या संस्थेची अॅम्ब्युलन्स व प्राणीमित्र शाबीर अन्सारी यांना घटनास्थळी बोलावल्यामुळे या पक्ष्याचा जीव वाचला. या प्राणीमित्रांनी या परदेशी पाहुण्याला आपल्या संस्थेत नेले असून योग्य तो उपचार करून त्याला निसर्गाच्या स्वाधीन करण्यात येईल. परदेशी पाहुण्याचा जीव वाचल्याने परिसरात या तरुणांचे कौतुक होत आहे.
१४ थेऊर
१४ थेऊर १