संस्थाचालक संस्थेच्या अध्यक्षपदी विजय कोलते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:08 AM2021-05-17T04:08:50+5:302021-05-17T04:08:50+5:30
या संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते यांची ...
या संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते यांची बिनविरोध निवड झाली.
संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व वसंतराव पवार शिक्षण प्रसारक मंडळ बारामती या संस्थेचे अध्यक्ष सतीश खोमणे व खेड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जुन्नर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, प्रकाश चांदमल बोरा यांची खजिनदारपदी, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर या संस्थेतील मुख्याध्यापक शिवाजी निवृत्ती घोगरे यांची सचिवपदी, तर सहसचिवपदी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे संचालक महेश अरविंद ढमढेरे यांची निवड करण्यात आली.
संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे ग्रामीण ही संस्था केंद्रीय राज्यमंत्री विजय नवल पाटील यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ या संस्थेशी संलग्न राहणार आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रस्थानी मानून शिक्षण क्षेत्रातील अडीअडचणी सोडविणे व शैक्षणिक संस्था बळकट करण्यावर भर दिला जाईल अशी प्रतिक्रिया अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केली. कार्यकारी मंडळावर निवड करण्यात आलेल्या संस्था चालकांमध्ये विजयकुमार एकनाथ दिवेकर-दौंड, गुरुमुख मटलामल नारंग - दौंड,
दत्तात्रेय पांडुरंग पाळेकर- मावळ, शंकर रामचंद्र भूमकर- हवेली, विरसिंह विश्वासराव रणसिंग- इंदापूर, जयसिंग बाळाजी काळे- आंबेगाव,
विलास लक्ष्मण पाटील - शिरूर,
योगेश लक्ष्मण ठोंबरे- मुळशी,
शांताराम शिवराम पोमण - पुरंदर यांचा समावेश करण्यात आला आहे. या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे पुणे जिल्ह्यातील संस्था चालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.