विलास कानडे यांच्याकडे पुणे महापालिकेच्या सोळा विभागांची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:09 AM2022-05-19T11:09:56+5:302022-05-19T11:11:22+5:30
विलास कानडे यांच्याकडे १६ विभागांची जबाबदारी...
पुणे : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या विलास कानडे यांच्याकडे १६ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका अधिकाऱ्यांमधून अतिरिक्त आयुक्त होणारे कानडे हे तिसरे अतिरिक्त आयुक्त असून, त्यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
कानडे यांच्याकडे पुढील विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. नगरसचिव विभाग, मागास वर्ग कक्ष, बीएसयूपी सेल, बीओटी सेल विभाग, प्राथमिक शिक्षण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग, उद्यान विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, सायकल विभाग, परिमंडळ विभाग क्र. २ व ४, मध्यवर्ती भांडार विभाग, जिल्हा नियोजन व विकास समिती विभाग (डीपीडीसी), समाजविकास विभाग, समाजकल्याण विभाग, मुद्रणालय विभाग, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र विभाग.