स्पर्धा बक्षिसाच्या रकमेतून गावासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:55+5:302021-05-18T04:09:55+5:30
शेटफळगढे : लामजेवाडी (ता. इंदापूर) येथे वॉटरकप स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतून पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसविण्यात आला आहे. गावातील ...
शेटफळगढे : लामजेवाडी (ता. इंदापूर) येथे वॉटरकप स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतून पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसविण्यात आला आहे. गावातील सर्व ग्रामस्थ महिला व तरुण मित्र मंडळींनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अफाट कष्ट करून यश प्राप्त केले. त्यातून गावाला इंदापूर तालुक्यातून प्रथम बक्षीस मिळाले. त्या रकमेतून गावाला पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय केली आहे.
स्पर्धेतून मिळालेल्या बक्षीस रकमेतून गावात सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून आपण वॉटर फिल्टर बसविण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. वॉटर फिल्टरचे जिल्हा परिषद हनुमंत बंडगर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी अजित कुंभार, सोमनाथ सवाणे, ग्रामपंचायत सदस्य राहुल वाबळे, गोपाळ धुमाळ उपस्थित होते. तर ज्येष्ठ गावकरी सोमनाथ शेलार यांच्या हस्ते यावेळी फिल्टर शुभारंभ करण्यात आला.
लामजेवाडी येथे फिल्टरचे उद्घाटन करताना जिल्हा परिषद सदस्य व अन्य.
१७०५२०२१ बारामती—०६
—————————————————