जिल्ह्यात आता ग्रामअभ्यासिका
By Admin | Published: January 10, 2017 02:50 AM2017-01-10T02:50:04+5:302017-01-10T02:50:04+5:30
जिल्हा परिषदेने आपल्या शेवटच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पुणे : जिल्हा परिषदेने आपल्या शेवटच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्यात एक अत्याधुनिक अशी ग्रामअभ्यासिका करण्यात येणार आहे. याला मंजुरी मिळाली असून यात प्राधान्याने स्पर्धा परीक्षच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
खेडोपाड्यातील मुलं शिकली, मोठी झाली तर हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असू शकते, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समाजमंदिरात प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक अभ्यासिका करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती.
मात्र, यात महत्त्वपूर्ण बदल करून आता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ ग्राम अभ्यासिका इमारतीसह अत्याधुनिक स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची केंद्र असलली गावे यासाठी निवडण्यात आली आहेत. एका अभ्यासिकेसाठी ३३ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून यात सुसज्ज इमारत, ग्रंथालय, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगली बैैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. १०० विद्यार्थ्यांची एका वेळेस व्यवस्था करण्यात येणार आहे. अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेली सर्व पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. तसेच इतर साहित्याची पुस्तकेही ठेवण्यात येणार आहे.
इथे होणार अभ्यासिका
खेड - शेलपिंपळगाव
मावळ - टाकवे. बु.
इंदापूर - अंथुर्णे
बारामती - सुपा
पुरंदर - वाल्हे
दौैंड - खुटबाव
शिरूर - न्हावरा
भोर - केंजळ
वेल्हा - वेल्हा
मुळशी - पौैड पं. स. इमारत
जुन्नर - नारायणगाव
आंबेगाव - निरगुडसर
हवेली - लोणीकंद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समाजमंदिरात प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक अभ्यासिका करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती.
५ गुंठे जागेत ही इमारत उभी राहणार असून, त्याची देखभालदुरुस्तीची जबाबदारी ही ग्रामपंचायतीवर असणार आहे. अशा स्वरूपाच्या गावात त्याही जिल्हा परिषदेमार्फत ग्रामअभ्यासिका असलेली पुणे ही राज्यात एकमेव जिल्हा परिषद असेल, असा दावाही प्रदीप कंद यांनी केला.
थोर पुरुषांचे स्मरण फक्त जयंतीनिमित्तच न करता त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहावी, सातत्याने त्यांचे विचार समाजात रुजावेत, यासाठी या अभ्यासिका काम करीत आहोत.
- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद