गाव गाड्याच्या प्रचाराचा सोशल मीडियावर धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:10 AM2020-12-24T04:10:48+5:302020-12-24T04:10:48+5:30
वार्ड बैठका गाव बैठक आसन वाड्यावरील घरोघरी व तालुक्यातील चौकाचौकात रणनीती साठी इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठकांच्या फैरी सुरू ...
वार्ड बैठका गाव बैठक आसन वाड्यावरील घरोघरी व तालुक्यातील चौकाचौकात रणनीती साठी इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठकांच्या फैरी सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारदस्त मिक्सिंग केलेले व्हिडिओ ऑडिओ उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांच्या जुन्या प्रचार यंत्रणेत दिवसेंदिवस बदल होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची बांधणी सुरू आहे अद्याप नामनिर्देशन पत्र भरणे आणि काढणे अशा बऱ्याच गोष्टी पुढे असल्या तरीही गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुक उमेदवारांनी मात्र प्रचाराचा धडाका सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केल्याचे दिसत आहे.
--
आता नाही तर पुन्हा नाही..
हजार पाचशेच्या नादी लागू नका आता नाहीतर पुन्हा नाही, भाऊचा नाद म्हणजे समोरचा हमखास वाद, इतिहास वाचायला नाहीतर रचायला आलोय, कोरोनात गाव बंदी करणारे आता गावाला या म्हणून आग्रह करतील याला खाली कसा आणायचा असा खोचक बोचऱ्या प्रचाराबरोबर इंदुरीकर महाराजांचे कीर्तनातील वाक्य यामधूनही उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. यंदा डोअर टू डोअर प्रचाराच्या फेरीआधी सोशल मिडीयावर दणदणीत प्रचार सुरु आहे. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ ऑडिओ व मिक्सिंग चित्रांची रेलचेल सोशल मीडियावर दिसत आहे.
--