पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 03:22 PM2021-06-25T15:22:16+5:302021-06-25T15:22:32+5:30

तालुक्यातील ग्रामस्थांकडून प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन, गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून

Villagers in Baramati strongly oppose Purandar International Airport; Let's stop trying to grab land | पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू

googlenewsNext
ठळक मुद्देनियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी या गावातील जमिनी घेण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही सर्व्हे झालेला नाही

सुपे: बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याने नव्याने होणाऱ्या नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यासंदर्भातील निवेदन तालुक्याचे प्रांताधिकारी तसेच तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

यापूर्वी पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची नियोजित जागा बदलून बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी आणि आंबी खुर्द आदी गावांचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र हा प्रयत्न बारामती तालुक्यातील गावे हाणून पाडतील असा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. 

मात्र विमानतळासाठी गावातील जमिनी घेण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही सर्व्हे झालेला नाही. तसेच प्रशासनाकडून आम्हाला तशी कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. याठिकाणी मागील सहा वर्षापासून जनाई उपसा योजनेचे पाणी येत असल्याने येथील बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. 

तसेच चांदगुडेवाडी गावाच्या दक्षिण बाजूने कऱ्हा नदी वाहत आहे. त्यामुळे चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावातील संपूर्ण क्षेत्र हे बागायत स्वरूपाचे झाले आहे. या परिसरात ऊस, कांदा, गहू, टोमॅटो इत्यादी नगदी स्वरूपाची पिके घेण्यात येत आहेत. तसेच डाळिंब, पेरू, सिताफळ इत्यादी फळबागा देखील मोठया प्रमाणात घेतल्या जात आहेत. तसेच या गावामध्ये २५ ते ३० शेततळी देखील शेतकऱ्यांनी तयार केलेली आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी माळरान जमिनी सुद्धा मोठ्या कष्टाने बागायती केलेल्या आहेत.

या गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. तसेच चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावामध्ये शेती बरोबर पशुपालन व पोल्ट्री व्यवसाय देखील मोठया प्रमाणात असून त्यामधून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळत आहे. अशी माहिती प्रांताधिकारी व तहसिलदारांना ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही गावांनी एकत्र येवुन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळास तीव्र विरोध दर्शविला आहे. 

Web Title: Villagers in Baramati strongly oppose Purandar International Airport; Let's stop trying to grab land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.