ग्रामस्थांनी केली कोविड सेंटर, आरोग्य केंद्राची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:45+5:302021-07-01T04:09:45+5:30

वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील उंच वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ केला. कोरोना संकटापासून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात ...

Villagers clean Kovid Center, Health Center | ग्रामस्थांनी केली कोविड सेंटर, आरोग्य केंद्राची स्वच्छता

ग्रामस्थांनी केली कोविड सेंटर, आरोग्य केंद्राची स्वच्छता

Next

वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील उंच वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ केला. कोरोना संकटापासून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात धनुर्वात (टीटी इंजेक्शन) लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र पुणे- पंढरपूर पालखी महामार्ग असल्याने, पालखी महामार्ग अनेक छोटो- मोठे अपघात होत असतात. यावेळी तातडीने टीटी इंजेक्शन देणे आवश्यक असले, तरी वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात, कोरोना संकटापासून टीटी इंजेक्शन उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्राधान्याने टीटी इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा गौरीताई कुंजीर, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष वंदना जगताप, सरपंच अमोल खवले, मा.सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे,मा.उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, उद्योजक सुनील पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदेश पवार,ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे आदी उपस्थित होते.

Web Title: Villagers clean Kovid Center, Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.