वन्य प्राण्यांच्यासाठी देऊळगावगाडाचे ग्रामस्थ एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:53+5:302021-05-29T04:09:53+5:30
सरपंच विशाल बारावकर यांनी ग्रामस्थ वर्गाच्या मदतीने व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून हे सामाजिकतेचे पाऊल उचलले आहे. आज देऊळगावगाडा अभयारण्य ...
सरपंच विशाल बारावकर यांनी ग्रामस्थ वर्गाच्या मदतीने व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून हे सामाजिकतेचे पाऊल उचलले आहे. आज देऊळगावगाडा अभयारण्य परिसरातील अनेक वन्य प्राण्यांची पाण्याअभावी धावपळ होत आहे. या अभयारण्य परिसरात अनेक लहान-मोठे वन्य प्राणी आढळून येत आहेत. यामध्ये हरीण, चिंकारा, तरस, लांडगा, मोर पक्षी, ससे असे अनेक प्राणी पहावयास मिळत आहेत.
आज पाण्याची भीषण टंचाई सध्या जाणवत असून वन्य प्राण्यांची पाण्याच्या अभावामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. हे पाणी टंचाईचे भीषण गंभीरता लक्षात घेऊन वनरक्षक पद्मिनी कांबळे, वन कर्मचारी नौशाद शेख यांच्या सहकार्याने एक टँकर पाणी पाणवठ्यात सोडण्यात आले. या प्रसंगी सरपंच विशाल बारावकर, अक्षय बारावकर, मल्हारी बारावकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २८ देऊळगाव गाडा पाणी पुरवठा
फोटोओळ : देऊळगावगाडा (ता.दौंड) परिसरातील अभयारण्य वनक्षेत्र परिसरात वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
===Photopath===
280521\28pun_11_28052021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक : २८ देऊळगाव गाडा पाणी पुरवठाफोटोओळ : देऊळगावगाडा (ता.दौंड) परिसरातील अभयारण्य वनक्षेत्र परिसरात वन्य प्राण्यांच्या साठी पाणी सोडण्यात आले आहे.