शिक्षकांसाठी ग्रामस्थांची चूल पेटली नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:56 AM2018-06-20T01:56:36+5:302018-06-20T01:56:36+5:30
नीरा वागज परिसरातील ग्रामस्थ शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.
बारामती : तालुक्यातील नीरा वागज परिसरातील ग्रामस्थ शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. सलग पाचव्या दिवशी डोंबाळे मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळा बंद राहिली. मंगळवारी (दि.१९) नीरा वागजच्या डोंबाळे मदनेवस्ती परिसरातील घरांमध्ये चूल पेटलीच नाही. उद्या ग्रामस्थ थाळीनाद आंदोलन करणार आहेत. बदली रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पहिल्याच दिवसापासून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी शाळेला टाळे ठोकण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांनीही या मागणीला पाठिंबा व्यक्त केला आहे.
मंगळवारी गावात चूल पेटलीच नाही. सर्वांनी उपवास धरत निषेध केला. बुधवारी (दि. २०) ग्रामस्थ थाळीनाद आंदोलन करणार आहेत.
मंगळवारी दुपारी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य अबोली भोसले, नीरा वागजच्या सरपंच मीनाक्षी देवकाते, सदस्य स्वाती देवकाते यांनी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. शिक्षकांच्या बदल्यांबाबत चर्चा केली. या वेळी ग्रामस्थांनी बदली रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी दिला.
तसेच, सर्व विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले काढून खासगी शाळेत प्रवेशाची तयारी ठेवल्याचे ग्रामस्थांनी या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासोा डोंबाळे, विठ्ठलराव देवकाते, सुधीर देवकाते, पोपटराव देवकाते, सुनील गावडे, सुरेश कोकरे, संग्राम मदने, बाळासाहेब देवकाते, अप्पासाहेब देवकाते आदी पालकांनी या वेळी चर्चेत सहभाग घेतला.
गावात संतोष गावडे, आबासाहेब कदम या दोघा शिक्षकांनी केलेला शैक्षणिक कायापालट ग्रामस्थांना भावला आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांनी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलनाचे सत्र सुरू ठेवले आहे. दरम्यान, येथे बदली झालेले सुवर्णा आडके, श्रीपाद देशपांडे यांच्यासह इनामदार (पूर्ण नाव माहीत नाही) हे शिक्षक त्यांना रुजू होऊ न दिल्याने दिवसभर झाडाखाली बसून होते.
>विद्यार्थ्यांचे नुकसान नको
जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी तावरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, शिक्षक बदल्यांच्या घोळामुळे, धोरणामुळे राज्यात अनेक शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. त्याचे नुकसान होत आहे. राज्य शासनाने सर्व अधिकार स्वत:क डे ठेवले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेला अधिकार ठेवले नाहीत. बुधवारी (दि २०)होणाºया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत यावर अवाज उठविणार असल्याचे तावरे म्हणाल्या.