Pune: कोरेगाव भीमात ग्रामस्थांनी बिबट्याला खोलीत कोंडले; माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 02:27 PM2023-07-28T14:27:07+5:302023-07-28T14:28:31+5:30
शिरुर वनविभागाकडून बिबट्याची बिबट निवारण केंद्रात रवानगी
कोरेगाव भीमा (पुणे) : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे आठ दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झालेले असताना आज पहाटेच्या सुमारास बिबट्या आजारी असल्याने एका कंपनी शेजारी असताना ग्रामस्थांनी हुसकावले. बिबट्या शेजारील एका खोलीत शिरला असता ग्रामस्थांनी बिबट्याला कोंडून घेतले. शिरुर वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेत त्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात केली आहे.
नागरिकांनी सावधानी बाळगा
कोरेगाव भीमा येथे लोकवस्ती नजीक बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आवाहन कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी केले. बिबट्या दिसला अगर कुत्र्यांचा भुंकण्याचा जास्त आवाज झाला तर फटाके फोडण्याचे आवाहन त्यांनी केले.