अवसरीत तलाठी कार्यालय होण्यासाठी वळसे-पाटलांना ग्रामस्थांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:07+5:302021-02-06T04:18:07+5:30
अवसरी बुद्रुक बाजारपेठेत शासकीय कचेरीची इमारत जीर्ण अवस्थेत उभी आहे या इमारतीची पूर्णपणे पडझड झाली असून मागील २०-२५ वर्षांपासून ...
अवसरी बुद्रुक बाजारपेठेत शासकीय कचेरीची इमारत जीर्ण अवस्थेत उभी आहे या इमारतीची पूर्णपणे पडझड झाली असून मागील २०-२५ वर्षांपासून पडल्यामुळे तिचा वापर नाही, सध्या अवसरी बुद्रुक येथे असणाऱ्या एका छोट्याशा खोलीमध्ये तलाठी कार्यालयाचे काम चालू आहे. या कार्यालयात अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी या तीन गावांचा कारभार चालत असल्याने कामकाजासाठी या जागेची कमतरता भासते. अवसरी बुद्रुक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून बाजारपेठेत असणाऱ्या शासनाच्या जागेत तलाठी कार्यालयाची इमारत व्हावी, अशी मागणी करत आहेत. यासाठी अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला मात्र त्याचा विचार केला गेला नाही, कित्येक गावांमध्ये जागेच्या अभावी अनेक शासकीय इमारती मंजूर होऊनदेखील बांधता येत नाही मात्र, अवसरी बुद्रुक येथे जागा असून अनेक वर्षांची मागणी असूनसुद्धा प्रशासन त्या ठिकाणी तलाठी कार्यालय उभारत नाही.
त्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन कचेरीच्या जागी तलाठी कार्यालय व्हावे अशी मागणी केली. यावेळी महेंद्र शहा, विनायक फल्ले, नामदेव चव्हाण, खंडू शिंदे, जयेश शहा, सागर फल्ले, अक्षय होनराव, कैलास शिंदे, सचिन वाडेकर, कैलास शिंदे, बाबू मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर आदी उपस्थित होते.
०५ अवसरी १