खोर ग्रामस्थांनी गावातूनच घेतले विठुरायाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:42+5:302021-07-21T04:08:42+5:30

ज्या दिवशी पालखी सोहळ्याचे तीर्थक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान झाले त्या दिवसापासून दरोरोज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काकडा आरती करण्यात ...

The villagers of Khor visited Vithuraya from the village itself | खोर ग्रामस्थांनी गावातूनच घेतले विठुरायाचे दर्शन

खोर ग्रामस्थांनी गावातूनच घेतले विठुरायाचे दर्शन

googlenewsNext

ज्या दिवशी पालखी सोहळ्याचे तीर्थक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान झाले त्या दिवसापासून दरोरोज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काकडा आरती करण्यात आली. आज आषाढी एकादशीला या काकडा आरतीची समाप्ती करण्यात आली आहे. दि.१९ रोजी भांडगाव येथे एसटी मधून निघालेल्या पालखी सोहळ्याचे दर्शन अनेक वारकरी संप्रदायातील ग्रामस्थांनी घेतले. खोरमध्ये सकाळच्या प्रहारी दिंडी प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये घरोघरी दारासमोर रांगोळ्याच्या पायघड्या घालून दिंडीचे पूजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी बा.... विठ्ठला पुढील वर्षी तरी पंढरपूरला येऊन आषाढी वारी घडवून तुज्या चरणी नतमस्तक होण्याचे भाग्य लाभू दे, अशी प्रार्थना केली गेली आहे. यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटोओळ : खोर ( ता.दौंड) येथील वारकरी संप्रदाय पंथानी आपल्या गावातूनच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये उपस्थित राहून महाभिषेक, पूजा, काकडा आरती करून विठुरायाचे दर्शन घेतले.

Web Title: The villagers of Khor visited Vithuraya from the village itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.