भादलवाडी तलावातील मातीउपशाला ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:00+5:302021-06-19T04:08:00+5:30

भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावात माती उपशास परवानगी शासनाने देऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी आघाडीचे इंदापूर तालुकाध्यक्ष ...

Villagers oppose erosion of Bhadalwadi lake | भादलवाडी तलावातील मातीउपशाला ग्रामस्थांचा विरोध

भादलवाडी तलावातील मातीउपशाला ग्रामस्थांचा विरोध

Next

भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावात माती उपशास परवानगी शासनाने देऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी आघाडीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत जाधव यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे.

भादलवाडी येथील हा तलाव विदेशी पक्षी फ्लेमिंगो तसेच विविध प्रकारचे देशी पक्षी या तलावात दिसून येतात. तर उजनी धरणात येणारे पक्षी आपल्या विणीसाठी या तलावात घरटी कार्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या तलावावर मासेमारी करून अनेक कुटुंबे आपले उदरनिर्वाह करत आहेत. परंतु गेल्या काही काळात नजीकच्या परिसरातील गावगुंडाने अवैधरीत्या रात्री अपरात्री माती व वाळूउपसा केला जातो. गाळपेर क्षेत्रातील माती उचलून जास्त दराने राज्यातील अनेक ठिकाणच्या वीटभट्टीसाठी विकली जाते. तसेच भरलेल्या रॉयल्टीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात माती उचलली जाते, त्यामुळे महसूल विभागाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडाला जातो. मागील काळात या माती उपशावरून दोन गटांमध्ये मारामारी होऊन येथील माती रक्तरंजित झालेली आहे. या प्रकरणी गंभीर गुन्हे भिगवण पोलीस दप्तरी दाखल झाले आहेत. या तलाव परिसरातील भादलवाडी, डाळज या भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील गावातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे निवेदन इंदापूर जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय कार्यालय बारामती तहसीलदार कार्यालय इंदापूर तसेच जलसिंचन विभाग पळसदेव यांना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेच्या वतीने दिले आहे.

Web Title: Villagers oppose erosion of Bhadalwadi lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.