Hiware Bazar: गावाच्या विकासासाठी धावून आले गावकरी; उभे केले तब्बल ४० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 01:28 PM2022-01-06T13:28:07+5:302022-01-06T13:28:45+5:30

हिवरे बाजार मधील गावकऱ्यांनी हे काम केले व आदर्श गाव ही आपली ओळख अधिक मजबूत केली.

villagers rushed for the development of the hivare bajar village 40 lakhs raised | Hiware Bazar: गावाच्या विकासासाठी धावून आले गावकरी; उभे केले तब्बल ४० लाख

Hiware Bazar: गावाच्या विकासासाठी धावून आले गावकरी; उभे केले तब्बल ४० लाख

Next

पुणे: कोरोनामुळे सरकारकडून ठेकेदारांची बीले थकली, काम थांबले. त्याचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली. तसे होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी गावातूनच ४० लाख रूपये उभे केले व ठेकेदारांची बीले भागवली व विकासाची वाट मोकळी केली. हिवरे बाजार (ता.नगर, जि. अहमदनगर) मधील गावकऱ्यांनी हे काम केले व आदर्श गाव ही आपली ओळख अधिक मजबूत केली.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि. १) झालेल्या ग्रामसभेत या आदर्श कृतीबरोबरच अनेक गोष्टी झाल्या. त्यात शेतीपासून ते जनावरांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा हिशोब करून वर्षअखेरी ८ कोटी ३६ लाख लिटर पाणी शिल्लक असेल याची नोंद होती. ग्रामपंचायतीचा जमाखर्च, गावातील पिकाचे नियोजन, सरकारी योजनांची कामे, महिलांची आरोग्य तपासणी असे अनेक विषय या ग्रामसभेत मांडण्यात आले. बिलांअभावी रखडलेल्या विकासकामांसाठी उसने पैसे देणारे शेतकरी, शिक्षक, माजी सैनिक यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या सर्वांनी हे पैसे गावासाठी बिनव्याजी दिले हे विशेष.-----

पद्मश्री किताब मिळालेल्या पोपटराव पवार यांचे हे गाव. पवार म्हणाले, कामे रखडली असली तर त्यांची किंमत वाढली असती. त्याचा बोजा गावावरच पडला असता. ते गावकऱ्यांनाच होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे अनेकांनी उसने पैसे देऊ केले. त्यामुळ वाढणारा २५ टक्के खर्च कमी झाला. गावच्या अडचणीच्या काळात गावचेच लोक उभे राहतात ही आनंददायी गोष्ट आहे. 

Web Title: villagers rushed for the development of the hivare bajar village 40 lakhs raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.