विकासकामे दर्जेदार होण्यासाठी ग्रामस्थांनी लक्ष द्यावे: वीरधवल जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:06+5:302021-09-26T04:11:06+5:30
लिंगाळी ग्रामपंचायत अंतर्गत जगदाळेवस्ती येथील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन वीरधवल जगदाळे यांच्या ...
लिंगाळी ग्रामपंचायत अंतर्गत जगदाळेवस्ती येथील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विकास कदम, बादशाह शेख, सरपंच सुनील जगदाळे, उपसरपंच वैजंता चितारे, नितीन चितारे, फिलीप धुमाळ, अनिल साळवे, मोहन पडवळकर, आनंद बगाडे, जालिंदर जगदाळे, सुधाकर चितारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शहराच्या जवळच असलेली जगदाळेवस्तीतील बंदिस्त गटर, रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारादरम्यान या भागातील लोकांनी हे प्रश्न जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्याकडे मांडले होते. या भागात मोलमजुरी करणारे तसेच छोटा व्यवसाय करणारे नागरिक राहतात. दरम्यान, वीरधवल जगदाळे यांनी पाठपुरावा करत या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या कामामुळे या भागातील आरोग्याचा प्रश्न देखील काही प्रमाणात सुटणार आहे. सध्या कोरोनाचा काळ असल्याने नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत दक्षता घेण्याची फार गरज आहे. लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. रस्ते ,पाणी, लाईट या मूलभूत गरजांसाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील असून नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन वीरधवल जगदाळे यांनी केले.
२५ दौंड
जगदाळेवस्ती येथे रस्त्याचे उद्घाटन करताना जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व इतर.