मलघेवाडीत ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:17+5:302021-05-24T04:09:17+5:30
महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह या कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये भीमा नदीमधून विहिरीत येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाची तरतूद केली आहे..त्याकरिता भीमा शुद्ध ...
महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह या कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये भीमा नदीमधून विहिरीत येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाची तरतूद केली आहे..त्याकरिता भीमा शुद्ध जल आरो प्रकल्प बसविला आहे. महिंद्रा कंपनीचे अधिकारी अनिल काला यांच्या हस्ते या शुद्ध जल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जीवनविद्या फौंडेशनचे विश्वस्त संतोष तोत्रे,.गिरीश सुकाळे, पिंपरी शाखेचे अध्यक्ष अमर गावडे, चंद्रकात लोखंडे, .राजेंद्र पाटील,शिवाजी कारले, सोमनाथ मुसळे. विलास मांजरे, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा मलघे, मयुरी मांजरे, सतिश मलघे, गणेश मांजरे, शरद मांजरे,माजी सरपंच बाळासाहेब मलघे, तंटामुक्ती उपाध्यक्ष साहेबराव मलघे, भगवान मलघे ,राहुल मलघे, सुरेश मलघे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. मांजरेवाडी पिंपळ, मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी ही गावे दत्तक घेण्यात आली आहे. आदर्श गाव बनविण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेने दिलेल्या उद्दिष्टांनुसार व महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह या कॉर्पोरेट कंपनीच्या सीएसआर फंडातून सुरू आहे. ह्या गावामध्ये लॉकडाऊन कालावधीत पर्यावरणाचा भाग म्हणून ५०० झाडांचे वृक्षारोपण करुन त्यांचे आणि संवर्धन करण्यात येत आहे.
जीवनविद्या फाऊंडेशन व महिंद्र कंपनी याच्या संयुक्त विद्यमाने मलघेवाडी येथे शुद्ध जल प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवर.