जिल्ह्यातील गावे होणार कचरामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:07+5:302021-05-30T04:09:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात प्रत्येक गावत घनकचरा प्रकल्प उभारून गावे कचरामुक्त करण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन महिन्यांत ...

Villages in the district will be garbage free | जिल्ह्यातील गावे होणार कचरामुक्त

जिल्ह्यातील गावे होणार कचरामुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात प्रत्येक गावत घनकचरा प्रकल्प उभारून गावे कचरामुक्त करण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन महिन्यांत हे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असून, जून महिन्यात गावे कचरामुक्त होतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी व्यक्त केला. यासोबतच प्रत्येक गावात घरोघरी नळजोडणीद्वारे पाणी पुरवण्याचे नियोजन असल्याचेही त्या म्हणाल्या. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन कार्यक्रमची अंमलबजावणी सुरू आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यस्तरावरून सन २०२०-२१ मध्ये पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्वच गावांतील वाड्या - वस्त्यांमध्ये कायमस्वरुपी शुद्ध व पर्याप्त पाणीपुरवठा करावयाचा आहे. या वार्षिक आराखड्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनानुसार जिल्ह्यातील सर्व गावांचे घनकचरा व्यवस्थापनाचे कामकाज, तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रकल्प आराखड्यानुसार गावांमध्ये योजना राबवावयाची आहे. याकरिता गावांचे सर्वेक्षण करून गावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्या येणार आहे. प्रकल्प अहवालाचे आधारे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. विविध कामांच्या निवीदा प्रक्रिया करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

सध्या जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपअभियंता, शाखा अभियंता तसेच काही कंत्राटी अभियंत्यांकडून हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पानसरे म्हणाल्या.

या दोन्ही योजनांची सर्वच गावांमध्ये प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक गावाकरिता किमान एका अभियंताची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोेणपे उपस्थित होते.

जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मोहीम स्वरूपात राबवून जुलै महिन्यापर्यंत प्रत्येक गावात सर्व ठिकाणची स्वच्छता करणे, सर्व ठिकाणचा कचरा उचलून त्याचे व्यवस्थापन करणे तसेच सर्व कुटुंब, शाळा, अंगणवाडी येथे नळकनेक्शन जोडणी करणे घर तिथे शोष खड्डा करून १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावे स्वच्छ, कचरामुक्त, व शोषखड्डायुक्त गाव करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती संस्था यांनी सक्रिय सहभाग द्यावा.

- निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

फोटो :

Web Title: Villages in the district will be garbage free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.