आंबेगावच्या पूर्व भागातील गावांनी यात्रा केल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:08+5:302021-05-03T04:06:08+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, अवसरी खुर्द, पिंपळगाव, चांडोली आदी गावात यात्रा हंगाम चालू होत आहे. मात्र ...
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, अवसरी खुर्द, पिंपळगाव, चांडोली आदी गावात यात्रा हंगाम चालू होत आहे. मात्र मागील वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने तालुक्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला असल्याने गावागावांतील यात्रा कमिटीच्या वतीने यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी अवसरी बुद्रुक येथे श्री भैरवनाथ महाराज मंदिरातील पुजारी व सरपंच पवन हिले यांनी देवाची पूजा, अभिषेक व आरती सोशल डिस्टन्स ठेवून करण्यात आली.
अवसरी खुर्द येथील श्री काळभैरवनाथ महाराज मंदिरावर रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र गावातील सर्व धार्मिक व यात्रा उत्सव रद्द केल्याची माहिती श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने देण्यात आली.