परिस्थितीवर मात करत विनायकचे यूपीएससीत उत्तुंग यश; आठ वर्षे दिली होती अपयशाने हुलकावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:20 IST2022-05-30T17:15:50+5:302022-05-30T17:20:45+5:30
366 वी रँक मिळवून यशाला गवसणी...

परिस्थितीवर मात करत विनायकचे यूपीएससीत उत्तुंग यश; आठ वर्षे दिली होती अपयशाने हुलकावणी
पुणे : तब्बल आठ वर्षे अपयशाने हुलकावणी दिली तरी निराश न होता सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मूळच्या शिक्रापूरच्या विनायक भोसले या तरुणाने केंद्रीय नागरी परीक्षा (यूपीएससी) परीक्षेत 366 वी रँक मिळवून यशाला गवसणी घातली आहे.
सोमवारी केंद्रीय नागरी परीक्षाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये विनायक भोसले हा तरून गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहून तयारी करत आहे. त्याला सनदी अधिकारी किंवा आयपीएसची पोस्ट मिळू शकते. विद्यार्थ्यांनी निराश न होता सातत्याने प्रयत्न करत राहावे असा संदेश भोसले याने दिला आहे.
आज जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थी वर्षोंवर्षे तयारी करतात.