विनोद गाढवे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:38+5:302021-03-27T04:11:38+5:30
:रावणगाव (ता. दौंड) येथील माजी सरपंच आणि भीमा-पाटस कारखान्याचे विद्यमान संचालक विनोद मानसिंग गाढवे (वय ४२) यांचे हृदयविकाराच्या ...
:रावणगाव (ता. दौंड) येथील माजी सरपंच आणि भीमा-पाटस कारखान्याचे विद्यमान संचालक विनोद मानसिंग गाढवे (वय ४२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले, पत्नी, आई, वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. दौंड बाजार समितीवर त्यांनी संचालक म्हणून काम केले होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून ते पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात पित्ताशयाच्या आजारावर उपचार घेत होते. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र काल सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती खालावली असल्याची खबर मिळताच आमदार राहुल कुल यांनी पुण्यातील रुग्णालयात धाव घेत तेथेच थांबून होते. गाढवे यांच्या निधनाने रावणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.