बंगालमधील हिंसाचार हा लोकशाहीचा खून : मुळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:19+5:302021-05-06T04:10:19+5:30
पुणे : बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंसाचार चालू केला आहे. भाजपच्या ...
पुणे : बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंसाचार चालू केला आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला करून मारहाण आणि जाळपोळ करण्यात येत असून, या हिंसाचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना जीवदेखील गमवावा लागला आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा हा उन्मत्तपणा म्हणजे लोकशाहीचा खून असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
निवडणूक निकालानंतर, बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी, भाजपा पुणे शहरच्या वतीने पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. त्या वेळी मुळीक बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार बापू पठारे, प्रभारी धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, महिला अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर आदी उपस्थित होते.