विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढला, पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 09:42 PM2020-11-08T21:42:53+5:302020-11-08T21:44:13+5:30
राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
पुणे : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात रविवारी आणखी घट झाली आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र, कोकणात शनिवारच्या तुलनेत किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. चंद्रपूरमध्ये शनिवारी सर्वात कमी किमान तापमान ११.५
५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.आज त्यात आणखी घसरण होऊन १० अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. ती सरासरीच्या तुलनेत ७.४ अंश सेल्सिअसने कमी आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १४.६, लोहगाव १७.४, जळगाव १३, कोल्हापूर २०.८, महाबळेश्वर १५.६, मालेगाव १४.४, नाशिक १२.६, सांगली २०.२, सातारा १८.८, सोलापूर १७.८, मुंबई २५.४, सांताक्रुझ २३, रत्नागिरी २४.२, पणजी २४.७, डहाणु २१.८, औरंगाबाद १४.४, परभणी १२, नांदेड १६, बीड १८.२, अकोला १३.२, अमरावती १३.३, बुलढाणा १५, ब्रम्हपुरी १४.३, चंद्रपूर १०, गोंदिया १२.२, नागपूर १३़४, वाशिम १३.८, वर्धा १३.४