समाईक शेतातील ओढ्यात मुरूम भरावावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:11 AM2021-05-12T04:11:47+5:302021-05-12T04:11:47+5:30
संपत लक्ष्मण कड (वय ४५ वर्षे,रा.वाकी ) यांच्या फिर्यादीनुसार रमेश ज्ञानेश्वर कड, अभिषेक रमेश कड, मनोज रमेश कड यांच्या ...
संपत लक्ष्मण कड (वय ४५ वर्षे,रा.वाकी ) यांच्या फिर्यादीनुसार रमेश ज्ञानेश्वर कड, अभिषेक रमेश कड, मनोज रमेश कड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि रमेश कड हे सख्खे चुलत भाऊ आहेत. फिर्यादी यांच्या घराच्या पाठीमागे सामाईक बांधाशेजारी असलेल्या ओढ्यात आरोपी दोन डंपर घेऊन मुरूम टाकण्यासाठी आले होते.
फिर्यादी यांनी मुरूम टाकण्यास मज्जाव केला असता मनोज कड याने दगडाने फिर्यादी यांना मारले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलीला आणि पुतण्यालाही दगडाने मारले. याच्या परस्पर विरोधात रमेश ज्ञानेश्वर कड यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार संपत लक्ष्मण कड, कैलास लक्ष्मण कड, आकाश कैलास कड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यांच्या शेतातील सामाईक बांधाशेजारी असलेल्या ओढयात मुरूम टाकताना आरोपींनी मुरूम न टाकण्यासाठी शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.
--------------------------------------------------------