व्हायरल पोस्टमुळे संपाबाबत संभ्रम, शेतकऱ्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 02:30 AM2018-05-27T02:30:52+5:302018-05-27T02:30:52+5:30
शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी एक जूनपासून किसान क्रांती संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. मात्र, या संपात सहभागी न होण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्यामुळे संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय, अशी शंका शेतक-यांमधून व्यक्त होते.
पिंपळवंडी - शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी एक जूनपासून किसान क्रांती संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. मात्र, या संपात सहभागी न होण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्यामुळे संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय, अशी शंका शेतक-यांमधून व्यक्त होते. यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शेतीमालाला व दुधाला बाजारभाव मिळत नाही; त्यामुळे शेतकरी संघटनांनी एक जून ते दहा जूनदरम्यान संप पुकारला आहे. राज्यातील काही संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. तर, काही शेतकरी संघटनांनी संप केल्यानंतर शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान होणार असल्याचे कारण देऊन संपात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यातच सध्या सोशल मीडीयावरुन एक पोस्ट व्हायरल झाली आहे. तीमध्ये ‘१ते १० जून जो बंद पुकारण्यात आला आहे, तो मोठ्या शेतकºयांकडून पुकारण्यात आलेला आहे.
नाशिक येथील टॉमेटो, द्राक्ष व डाळिंब संपली आहेत; त्यामुळे ते शेतकरी आता मोकळे झाले आहेत. त्यांनी १ डिसेंबर ते २५ मार्च या महिन्यात संप करावा. जुन्नर तालुक्यातील शेतकरी छोटे आहेत, त्यांचा सिझन २० मेपासून २५ जुलैपर्यंत चालू असतो. हे शेतकरी छोटे शेतकरी असून त्यांच्याकडे असलेल्या जमिनी या गुंठ्यांत आहेत. मोठा मासा छोट्या माशाला खातो तसेच मोठा शेतकरी छोट्या शेतकºयाला मारत आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील एकही छोटा शेतकरी संपावर जाणार नाही. मागीलवर्षी असाच काहीसा प्रकार मोठ्या शेतकºयांनी केला व गरीब शेतकरी मारले गेले. त्यामुळे या वर्षी संपूर्ण जुन्नर तालुक्यातील शेतकरी संप करणार नाहीत, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोस्टवरून लहान शेतकरी आणि मोठा शेतकरी, असा भेदभाव करून त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचा तर हा प्रकार नाही ना, असा प्रश्नही शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या संपात फूट पाडली जात आहे की काय, अशी शंका शेतकरी उपस्थित करीत असून या पोस्टमुळे शेतकºयांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.