Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 04:20 PM2024-05-28T16:20:19+5:302024-05-28T16:20:46+5:30

Pune Porsche Car Accident - सिसिटीव्हीत छेडछाड, कोणाला मदत मागितली आहे का? एकत्रित तपास यासाठी ७ दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती.

vishal agarwal and surendra agarwal in police custody till 31st in Pune Porsche Car Accident | Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. या प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकाराने उघडकीस येऊ लागली आहेत. पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालसहित कुटुंबाची कुंडली बाहेर काढली आहे. कालच सकाळी या प्रकरणात रक्ताच्या नमुने बदलल्याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता तपासाला चांगलाच वेग आला आहे. तसेच विशाल अग्रवाल याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासण्यात येत आहे. कल्याणी नगर अपघातात दररोज मोठमोठे खुलासे होत असताना, सीसीटीव्ही फुटेजमुळे अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांना मिळाली आहे. 

बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार यांना चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बाळाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सुरेंद्रकुमार अग्रवाल याचे छोटा राजनशी असलेले कनेक्शन या निमित्ताने पुन्हा समोर आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यातच दोघा बाप-बेट्यांनी त्यांच्या चालकाला डांबून ठेवून धमकी दिल्याने अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. बाळाच्या चुकीमुळे तीन पिढ्यांना जेलची हवा खावी लागत असल्याचे बोलले जात आहे. कालच्या प्रकरणानंतर त्यांनी अजून कोणाला मदत मागितली आहे का? हे तपासण्यासाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. 

'बाळा'साठी रक्त देणाराही पोलिसांच्या रडारवर; २ डॉक्टरांसह शिपायास ३० मेपर्यंत पोलिस कोठडी

वकिलांनी ड्राइवर चा फोन हस्तगत करायचा आहे. ⁠गाडी रिकवर केली आहे. त्याचा पुढचा तपास करायचा आहे. ⁠एकत्रित दोघांच्या प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यांनी आणखी कोणाची मदत घेतली आहे का? हा तपास करायचा आहे. तसेच ⁠सीसीटीव्ही मध्ये छेडछाड झाली आहे ती कोणी केली? या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी ७ दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: vishal agarwal and surendra agarwal in police custody till 31st in Pune Porsche Car Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.