Pune Porsche Accident Update: विशाल अग्रवालला फक्त एकाच गुन्ह्यात जामीन, इतर गुन्ह्यांसाठी मुक्काम कारागृहातच

By नम्रता फडणीस | Published: June 21, 2024 08:49 PM2024-06-21T20:49:25+5:302024-06-21T20:49:32+5:30

Pune Porsche Accident अग्रवालसह कोझी’ चे मालक व ‘ब्लॅक’ चां असिस्टंट मॅनेजर, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनाही जामीन मिळाला

Vishal Agarwal granted bail for driving a car while drunk but remains in jail Pune Porsche Accident | Pune Porsche Accident Update: विशाल अग्रवालला फक्त एकाच गुन्ह्यात जामीन, इतर गुन्ह्यांसाठी मुक्काम कारागृहातच

Pune Porsche Accident Update: विशाल अग्रवालला फक्त एकाच गुन्ह्यात जामीन, इतर गुन्ह्यांसाठी मुक्काम कारागृहातच

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना तसेच तो दारू प्यायलेला असतानाही कार चालवायला दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला शुक्रवारी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. अग्रवालसह कोझी’ चे मालक व ‘ब्लॅक’ चां असिस्टंट मॅनेजर, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनाही जामीन मिळाला आहे. मात्र चालकाला धमकावणे, तसेच अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यांमध्ये तो न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याचा मुक्काम येरवडा कारागृहातच असणार आहे.

कल्याणीनगर येथे १८ मे च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवित अभियंता तरुण-तरुणीला उडवले. या मुलाकडे वाहन परवाना नसतानाही त्याला कार चालवायला दिल्याप्रकरणी विशाल अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली. अपघाताच्या घटनेपूर्वी या मुलाने आपल्या मित्रांसोबत मुंढव्यातील ‘कोझी’ आणि ‘ब्लॅक’ पबमध्ये पार्टी केली होती. त्यांच्या वयाची खातरजमा न करता दोन्ही पबमध्ये मद्यविक्री केल्याबद्दल ‘कोझी’ पबच्या मालकाचा मुलगा नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्मविलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर) आणि ‘ब्लॅक’ पबचा असिस्टंट मॅनेजर संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाइट्स, मुंढवा), बार काउंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) आणि कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एनआयबीएम) यांना अटक करण्यात आली. या सहा आरोपींवर मोटार वाहन कायद्याच्या कलम ३, ५ व १९९ ए आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याच्या कलम ७५ व ७७ नुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात न्यायालयीन कोठडी झाल्यावर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विद्या विभुते आणि बचाव पक्षातर्फे अॅड. एस. के. जैन, अॅड. सुधीर शहा, अॅड. अमोल डांगे आणि अॅड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपींना जामीन मंजूर केला.

Web Title: Vishal Agarwal granted bail for driving a car while drunk but remains in jail Pune Porsche Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.