विश्रामबागवाड्याला मिळणार झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:34+5:302021-05-29T04:10:34+5:30
पुणे : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बाजीराव रस्त्यावरील विश्रामबागवाड्याला नवी झळाळी मिळणार असून, वाड्याच्या देखभालीची आणि दुरुस्तीची कामे केली जाणार ...
पुणे : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बाजीराव रस्त्यावरील विश्रामबागवाड्याला नवी झळाळी मिळणार असून, वाड्याच्या देखभालीची आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नुकतीच मंजुरी देण्यात आली. मेघडंबरीसह अन्य कामे केली जाणार असल्याची माहिती स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
विश्रामबागवाडा ही ग्रेड १ दर्जाची ऐतिहासिक वास्तू आहे. वाड्यातील धोकादायक मेघडंबरीची जतन संवर्धनाची व तदनुषंगिक वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीची कामे केली जाणार आहेत. यासोबतच वॉटरप्रूफिंग, जुनी मंगलोरी कौले बदलणे, सागवानी लाकूड कामातील कलाकुसरीचे कॉलम तयार करणे, सागवानी महिरपी तयार करणे, चुन्यामधील कलाकुसरीचे डिझाईन करणे, धोकादायक मेघडंबरी दुरुस्ती
लाकडावरील रंग घासून काढणे, लाकूड कामास शेलंक पॉलिश करणे, जुन्या पध्दतीतील डिझाईनप्रमाणे सागवानी लाकडातील दरवाजे खिडक्या बनविणे अशी कामे केली जाणार आहेत.
विश्रामबागवाड्याला मूळ स्वरूप वाड्यास प्राप्त
करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे रासने यांनी सांगितले.
---
१. वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरील शासकीय ग्रंथालयाच्या ताब्यात असलेली जागा दुरूस्तीअभावी अत्यंत धोकादायक झालेली आहे.
२. पहिल्या चौकाची व दर्शनी भागातील मेघडंबरी बनली धोकादायक