पुण्यात विश्रांतवाडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड! जागा मालकासह २५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:40 PM2021-05-27T18:40:06+5:302021-05-27T18:40:25+5:30

मोठ्या कारवाईत पाच वाहनांसह ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Vishrantwadi police raids gambling den in Pune Case filed against 25 persons including land owner | पुण्यात विश्रांतवाडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड! जागा मालकासह २५ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यात विश्रांतवाडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड! जागा मालकासह २५ जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देविश्रांतवाडी व परिसरात वारंवार कारवाई करून देखील चोरून छुप्या मार्गाने अवैध धंदे चालूच होते, मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले

पुणे: विश्रांतवाडी पोलिस ठाणे हद्दीत धानोरी परिसरात राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईत जागा मालकासह २५ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईत पाच वाहनांसह ७२ हजार ९८० रुपये रोख मुद्देमाल पोलिसांनी केला आहे. या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन हद्दीत धानोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार येरवडा पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र पथक नेमून सदर ठिकाणी सापळा रचून ही मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत जुगार चालवणारा विशाल पारखे तसेच जागामालक सुनील दीपक टिंगरे यांच्यासह जुगार खेळणाऱ्या 25 जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम ७२ हजार ९८० रुपये, दोन चारचाकी तर तीन दुचाकी, अकरा मोबाईल व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

विश्रांतवाडी व परिसरात वारंवार कारवाई करून देखील चोरून छुप्या मार्गाने अवैध धंदे चालूच असतात. स्थानिक पातळीवर जेमतेम कारवाई केली जाते. मात्र या कारवाईत थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यानंतर बाहेरील पोलीस पथकाच्या मदतीने घातलेल्या छाप्यात जुगाराचा मोठा अड्डा पोलिस उपायुक्तांनी उद्ध्वस्त केल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.अशाप्रकारे चोरून करण्यात येणार्‍या अवैध धंद्यांवर सातत्‍याने पोलिसांकडून कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी देशमुख यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Vishrantwadi police raids gambling den in Pune Case filed against 25 persons including land owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.