विश्रांतवाडीतील कर्मचारी मानसिक त्रासामुळे रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:05 AM2020-11-27T04:05:03+5:302020-11-27T04:05:03+5:30
\Sलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अवैध धंद्यावर कारवाई करतो म्हणून एका पोलीस शिपायाला पोलीस निरीक्षकांनी सातत्याने दमदाटी करुन चार दिवसात ...
\Sलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अवैध धंद्यावर कारवाई करतो म्हणून एका पोलीस शिपायाला पोलीस निरीक्षकांनी सातत्याने दमदाटी करुन चार दिवसात त्याचा परिणाम दिसेल, अशी तंबी दिल्याने पोलीस शिपायाचे मानसिक व शारीरीक स्वास्थ बिघडले. त्यामुळे त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाºयाने थेट पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे आपली कैफयित मांडली आहे. त्यातून या वादग्रस्त पोलीस निरीक्षकांचा आणखी कारनामा पुढे आला आहे.
या कर्मचाºयाने वरिष्ठांच्या आदेशानुसार गेल्या दीड वर्षात स्वत ४५ तर तपास पथकाच्या मदतीने ६० अशा १०५ अवैध धंद्यांवर कारवाया केल्या. तपास पथकाने धंदेवाल्यावर कारवाई केल्यानंतर हे पोलीस निरीक्षक त्यांना कॉल करुन कोण कोण रेड टाकायला आले होते, याची खबर घेत. त्यानंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयांना बोलावून दमदाटी केली जाते. संबंधित कर्मचाºयावर दबाव टाकून पैशाची मागणी करणे, दमदाटी करणे असे प्रकार करीत असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. पोलीस निरीक्षकाने या कर्मचाºयाला सारखे बोलावून धमकावत असे़ अवैध धंदेवाले तुझ्यावर नाराज आहेत़ तू शहाणा असशील तर येथून बदली करुन जा़ येथे थांबू नको, अशी दमदाटी केली़ त्यांना महिलेच्या माध्यमातून अडकविण्याचा प्रयत्न केला़ हे लक्षात आल्यावर त्यांचे मानसिक व शारीरीक स्वास्थ बिघडले़ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांनी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे़ देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ परंतु संपर्क होऊ शकला नाही़.