विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पुण्यात ‘अन्नपूर्णा रथ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:24+5:302021-05-20T04:12:24+5:30
गरजूंना भोजन : २ महिने उपक्रम सुरू राहणार पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊनमुळे अनेकांना उदरनिर्वाहासाठी देखील बाहेर पडता ...
गरजूंना भोजन : २ महिने उपक्रम सुरू राहणार
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊनमुळे अनेकांना उदरनिर्वाहासाठी देखील बाहेर पडता येत नाही. यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अन्नपूर्णा रथ हा उपक्रम राबविला जात आहे. गोरगरीब, मजूर,रस्त्यावर राहून उपजीविका करणारे, तसेच हातावर पोट असणाऱ्यांची संख्या पुण्यात मोठी आहे. त्यांना दररोज भोजनाची व्यवस्था विश्व हिंदू परिषदेच्या वतीने केली जात आहे.
विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग मंत्री तुषार कुलकर्णी, कृष्णकांत चांडक, हर्षद नातू, अनंत शिंदे, राजेश जाधव, नाना क्षीरसागर, प्रतीक गोरे, अमित चिटणीस, संजीवनी चौधरी, कमलेश तिवारी आदी कार्यकर्ते या उपक्रमात सहकार्य करीत आहेत. मागील वर्षी देखील विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होते. त्यावेळी २० हजारांपेक्षा जास्त लोकांना भोजन देण्यात आले होते.