हर्षवर्धन पाटलांकडे विकासाची ‘व्हिजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:25 AM2018-08-26T00:25:36+5:302018-08-26T00:25:51+5:30

काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नियोजनबद्ध पद्धतीने २0 वर्षांत इंदापूर तालुक्याचा विकास केला आहे, त्यांच्याकडे विकासाचे ‘व्हिजन’ आहे.

'Vision' for development of Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांकडे विकासाची ‘व्हिजन’

हर्षवर्धन पाटलांकडे विकासाची ‘व्हिजन’

Next

बावडा : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नियोजनबद्ध पद्धतीने २0 वर्षांत इंदापूर तालुक्याचा विकास केला आहे, त्यांच्याकडे विकासाचे ‘व्हिजन’ आहे. त्यामुळे तालुक्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचीच गरज असल्याचे प्रतिपादन नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले आहे.

शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव होते. रक्तदान शिबिरात १४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर रक्तपेढीचे सहकार्य लाभले. या वेळी वृक्षारोपण, गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. कृष्णाजी यादव, मयूरसिंह पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलास वाघमोडे, मनोज पाटील, अमरसिंह पाटील, मंगेश पाटील यांची भाषणे झाली. प्रास्ताविक कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी केले. कार्यक्रमास संचालक उदयसिंह पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, दत्तात्रय शिर्के, रणजित रणवरे, सुरेश मेहेर, प्रताप पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, गोरख शिंदे, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगेआदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कालिदास आव्हाड यांनी केले, तर आभार बी. एस. पाटील यांनी मानले.

Web Title: 'Vision' for development of Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.