वाहतूक सुधारणेसाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’
By Admin | Published: October 13, 2016 01:38 AM2016-10-13T01:38:52+5:302016-10-13T01:38:52+5:30
पुणे शहराची वाहतूक समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रस्त्यांची लांबी चार हजार किलोमीटरच्या घरात असली, तरी रुंदी मात्र खूपच कमी आहे
लक्ष्मण मोरे
पुणे : पुणे शहराची वाहतूक समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रस्त्यांची लांबी चार हजार किलोमीटरच्या घरात असली, तरी रुंदी मात्र खूपच कमी आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक सुधारणेसाठी अभ्यासपूर्ण असे ‘व्हिजन डॉक्युमेंट २०१६’ तयार केले असून, समस्यांची कारणमीमांसा केली आहे. अद्ययावत नसलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अरुंद आणि चिंचोळे रस्ते, पादचारी, सायकलस्वार यांच्यासाठीच्या उपाययोजनांचा अभाव, रस्त्यांवरचे खड्डे, नादुरुस्त आणि सदोष सिग्नल यंत्रणा, पदपथ व रस्त्यांवरची अतिक्रमणे, वाहतूक पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ अशा अनेक मुद्यांवर सुधारणा करण्याची आवश्यकता या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे.
नुकतेच पुणे शहर वाहतूक पोलिसांनी ६ आॅक्टोबर रोजी वाहतूक जनजागृती दिवस साजरा केला. शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, नागरिकांच्या सहभागातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची लाखो नागरिकांना शपथ देण्यात आली. नियमांचे पालन कायद्याच्या सक्तीपेक्षा स्वयंप्रेरणेमधून अधिक चांगल्या प्रकारे केले जाऊ शकते. सुधारणेची सुरुवात स्वत:पासून केली जाण्याची आवश्यकता असते. वाहतुकीची नित्याची कोंडी आणि त्यातून सर्वसामान्यांना होणारा मानसिक त्रास नित्याचाच झालेला आहे. या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवणे जशी वाहतूक पोलिसांची जबाबदारी आहे तशीच ती स्थानिक स्वराज्य संस्थांचीही जबाबदारी आहे. दोन्ही बाजूने सुचवल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि सूचनांवर जर वेळीच अंमलबजावणी झाली, तर पुण्याची वाहतूकही स्मार्ट व्हायला वेळ लागणार नाही.
प्रभात रस्ता गल्ली क्रमांक : ८
प्रभात रस्त्यावरच्या घोडके चौकाला कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकाक डून येणारा रस्ता मिळतो. हाच रस्ता पुढे भांडारकर रस्त्याला जाऊन मिळतो. या चौकात कायमच वाहतूककोंडी अनुभवायला मिळते.
शिवाजी चौक :
सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या पाषाण रस्त्यावर मुख्य जंक्शन आहे. येथून सूस रस्ता आणि पुढे महामार्ग तसेच हिंजवडी आयटी पार्क जाणारे ‘टी’ जंक्शन आहे.
वि. स. खांडेकर चौक
सेनापती बापट रस्त्यावरच्या या चौकामधून एक रस्ता बीएमसीसीक डून फर्ग्युसन रस्त्याला जाऊन मिळतो.
दत्तनगर जंक्शन :
पुणे-सातारा रस्त्याकडून सोलापूर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्याची आवश्यकता आहे.
माऊली पेट्रोलपंप :
पुणे विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेलकडे जाणाऱ्या बाणेर रस्त्यावर हे टी आकाराचे जंक्शन आहे. येथून एक रस्ता विधातेवस्तीवरून पल्लोड फार्ममार्गे औंध गावामध्ये जातो.
डीएसके रानवारा चौक
पुणे विद्यापीठाकडून चांदणी चौकाकडे
जाणाऱ्या पाषाण रस्त्यावर बावधन येथे हे टी आकाराचे जंक्शन आहे. येथून एक रस्ता
मुंबई-बंगळुरु महामार्गाला बावधन उड्डाणपुलाला जाऊन मिळतो.
हरे कृष्ण चौक, कात्रज :
कात्रज-कोंढवा रस्त्यावरच्या
टी जंक्शनवरून एक रस्ता गंगाधाम, मार्केट यार्डकडे येतो. राजस सोसायटी चौक
कात्रज-कोंढवा बाह्यवळण रस्त्यावरील या चौकामधून एक रस्ता राजस सोसायटीमार्गे बिबवेवाडीकडे येतो, तर दुसरा रस्ता कात्रज तलावाकडे जातो.
किराड चौक :
लष्कर भागातील पंडित नेहरू मेमोरियल हॉल चौक ते जहांगीर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या साधू वासवानी रस्त्यावर पोलीस आयुक्तालयासमोर हा चौक आहे. येथून एक रस्ता हॉटेल ब्ल्यू नाईलकडे, तर दुसरा रस्ता स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेकडे जातो.
बेनकर वस्ती :
सिंहगड रस्ता ते धायरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे टी आकाराचे जंक्शन आहे. येथून एक रस्ता नऱ्हे गावाकडे जातो.
बनकर चौक :
पुणे-सासवड रस्त्यावरच्या ग्लायडिंग सेंटरसमोरील टी जंक्शन असलेल्या या चौकातून एक रस्ता सातवनगरकडे जाऊन पुढे सोलापूर रस्त्याला मिळतो.
मांजरी फाटा :
पुणे-सोलापूर रस्त्यावरच्या या टी जंक्शनवरून एक रस्ता मांजरी गावाकडे जातो. हाच रस्ता पुढे मुंढवा केशवननगरकडे जातो.
तुकाईदर्शन चौक :
सासवड रस्त्यावरच्या तुकाईदर्शन चौकामधून एक रस्ता तुकाई
टेकडीकडे जातो. तर, विरुद्ध
बाजूचा रस्ता सोलापूर रस्त्याला
जाऊन मिळतो.
काळूबाई चौक :
पुणे-सोलापूर रस्त्यावरचे हे टी जंक्शन असून, या ठिकाणाहून एमआयडीसी हडपसर व मगरपट्टा सिटीकडे जाण्यासाठी रस्ता आहे.
गोयलगंगा पंक्चर चौक :
सिंहगड रस्त्यावरच्या टी जंक्शनवरून एक रस्ता आंबेगावकडे जातो.
पंचवटी जंक्शन चौक
शिवाजी चौक ते पाषाण-सूस रस्त्यावर हे टी जंक्शन आहे.
सूस रस्ता, साई चौक :
शिवाजी चौक ते पाषाण-सूस रस्त्यावर हे टी जंक्शन असून, एक रस्ता पाषाण गावाकडे जातो.
पोल्ट्री अंडरपास : पोल्ट्री रेल्वे अंडरपास येथील पुलाच्या मजबुतीकरणाच्या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने एकाच वेळेला पास होत नाहीत. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्याकरिता अंडरपासच्या दोन्ही बाजूला सिग्नल आवश्यक आहे.
काळेपडळ कॉर्नर : हडपसर वेस ते महंमदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या रेल्वे गेटजवळ हे जंक्शन आहे. एक रस्ता ससाणेनगर रेल्वेगेटकडे जातो. तर, दुसरा रस्ता रामटेकडी एमआयडीसीकडे जातो.
अरण्येश्वर चौक : मित्रमंडळ चौक ते हाईड पार्क सोसायटीदरम्यान हा मुख्य चौक आहे.
बालाजी चौक : शिवाजी चौक ते पाषाण-सूस रस्त्यावरच्या टी जंक्शनवरून एक रस्ता बाणेर लिंक रोडला जातो.
गणराज मंगल कार्यालय चौक :
बाणेर रस्त्यावर हा चौक आहे.
दोराबजी मॉल जंक्शन : हे जंक्शन रामवाडी ते विमानतळ या नवीन रस्त्यावर आहे. एक रस्ता गणपती मंदिर चौकाकडून नगर रस्त्याला जाऊन मिळतो.
म्हसोबा चौक :
जवळकरनगर या ठिकाणी नाशिक फाट्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढलेली आहे. तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचा वेग अधिक असतो. वेगात आलेली वाहने म्हसोबा चौकात सृष्टी चौकाकडून येणारी वाहने आणि स्वराज गार्डनकडून येणारी वाहने येथे क्रॉस होतात.
चांदणी चौक :
भोसरी गावातील उड्डाणपुलाच्या खाली जंक्शन आहे.
बाबर पेट्रोलपंप जंक्शन :
हे टी आकाराचे जंक्शन पुणे-नाशिक महामार्गावर आहे. टेल्को रस्त्यावरून हे जंक्शन सुरू होते.
चिखली चौक :
पुणे-नाशिक महामार्गावरुन बिराडे वस्ती
हा रस्ता चार पदरी असून, चिखली गावात
हा चौक आहे.
गुडविल चौक :
नाशिक महामार्गावरती भोसरी पोलीस ठाण्याच्या पुढे एमआयटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे टी जंक्शन आहे.
सिम्बायोसिस
स्कूल चौक :
रामवाडी ते विमानतळ या नवीन रस्त्यावरच्या जंक्शनमधून एक रस्ता सी.सी.डी. चौकामधून दत्तमंदिर चौक, श्रीकृष्ण चौकातून फिनिक्स मॉलजवळ नगर रस्त्याला मिळतो.
सूस रस्ता सुतारवाडी शिवशक्ती चौक :
शिवाजी रस्त्यावरच्या
पाषाण ते सूस रस्त्यावरील
टी जंक्शन आहे.
नवले चौक :
मुंबई-बंगळुरु महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाखाली हा चौक आहे. वाय आकाराचे हे जंक्शन असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर
वाहतूककोंडी होत असते.