कृषिक्षेत्रच्या विकासासाठी ‘व्हिजन फाली’
By admin | Published: November 13, 2014 11:58 PM2014-11-13T23:58:10+5:302014-11-13T23:58:10+5:30
‘भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक’ या उपक्रमांतर्गत सन 2क्2क्र्पयत 1क् लाख शालेय विद्यार्थी कृषिक्षेत्रशी जोडले जाणार असून, त्यासाठी ‘व्हिजन फाली’ची सुरुवात करण्यात आली आहे.
Next
डिंभे : ‘भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक’ या उपक्रमांतर्गत सन 2क्2क्र्पयत 1क् लाख शालेय विद्यार्थी कृषिक्षेत्रशी जोडले जाणार असून, त्यासाठी ‘व्हिजन फाली’ची सुरुवात करण्यात आली आहे. देशभरातील 6 नामवंत कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘फ्युचर फार्मर्स ऑफ अमेरिका’च्या धर्तीवर शालेय विद्याथ्र्याना कृषिमूल्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे.
‘भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक’ उपक्रमांतर्गत सन 2क्2क्र्पयत 1क् लाख शालेय विद्यार्थी कृषिक्षेत्रशी जोडण्याचा मानस आहे. यासाठी व्हिजन ऑफ फालीची सुरुवात झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सध्या राज्यातील 6 शाळांमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. फ्युचर फार्मर्स ऑफ अमेरिका या संस्थेकडून प्रेरणा घेऊन सध्या देशात भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी अॅक्शन प्लेटोफॉर्म, गोदरेज, अॅग्रोव्हेट, युपीयल आणि महिंद्रा राईस या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. 2क्2क्र्पयत 2क् लाख कुशल शेतकरी तयार करण्याचा मानस असल्याचे मत युपियलचे मॅनेजर प्रसुन्न सरकार यांनी पोखरी (ता. आंबेगाव) येथे व्यक्त केले.
पुणो जिल्ह्यातील हिरकणी विद्यालय, गावडेवाडी, श्री पंढरीनाथ विद्यालय पोखरी, सातारा विद्या विकास मंदिर काळढोण, भारतमाता विद्यालय मायणी (ता. खटाव) व जळगावमधील धनाजीनाना विद्यालय, खिरोडा व माध्यमिक आश्रमशाळा लेहारा (रावेर) या शाळांचा त्यात समावेश आहे. या प्रसंगी प्रसून सरकार, डॉ. के. बी. पाटील, अभिनव भल्ला, हर्ष नोटीयाल, मोहन दुसारिया, सचिन पवार, कैलास जाधव, युवराज मोहडकर, तुषार जाधव, समीर डोंगरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
4या उपक्रमात सहभागी झालेल्या चार प्रमुख कंपन्यांपैकी जैन इरिगेशन ही कंपनी प्रकल्प उभारण्यासाठी शेडनेट, नर्सरी, भाजीपाला व्यवसाय व फूलशेतीबाबत मदत करणार आहे. युपीयलच्या माध्यमातून माती परीक्षण किट व तंत्रज्ञान पुरविले जाणार आहे. गोदरेज अॅग्रोव्हेट प्रत्येक युनिटसाठी दुधाळ गाईचा पुरवठा करणार आहे. तर, महिंद्रा कंपनीकडून ट्रॅक्टरचे पार्ट पुरविण्यात येतील. निवड झालेल्या शाळांमध्ये शेती प्रयोगशाळा उभारली जाणार असून, आठवडय़ातील एक दिवस आठवीच्या वर्गातील विद्याथ्र्याना पॉलीहाऊस, तुषार सिंचन, जाळ्यांनी गोठा बनविणो, शेतीचे यांत्रिकीकरण व विकसित शेतीत प्राण्यांचा वापर इ. शिक्षण विविध कंपन्यांमार्फत दिले जाणार आहे. सहभागी शाळांतील निवड झालेल्या विद्याथ्र्याना अमेरिकेत होणा:या वार्षिक परिषदेत उपस्थित राहण्याची संधी मिळेल, असे प्रसून सरकार यांनी सांगितले.जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पंढरीनाथ विद्यालय पोखरी व हिरकणी विद्यालय गावडेवाडी या शाळांची ‘लेंड अ हॅँड इंडिया’ संस्थेच्या माध्यमातून उपक्रमासाठी निवड झाली आहे.