व्हिजन, कांबळे अ‍ॅकॅडमी अंतिम फेरीत

By admin | Published: May 12, 2017 05:31 AM2017-05-12T05:31:42+5:302017-05-12T05:31:42+5:30

व्हिजन अ‍ॅकॅडमी संघाने विराग अ‍ॅकॅडमीचा, तर सागर कांबळे अ‍ॅकॅडमीने गायकवाड अ‍ॅकॅडमीचा पराभव करून पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी

Vision, Kamble Academy in the final round | व्हिजन, कांबळे अ‍ॅकॅडमी अंतिम फेरीत

व्हिजन, कांबळे अ‍ॅकॅडमी अंतिम फेरीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : व्हिजन अ‍ॅकॅडमी संघाने विराग अ‍ॅकॅडमीचा, तर सागर कांबळे अ‍ॅकॅडमीने गायकवाड अ‍ॅकॅडमीचा पराभव करून पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी आयोजित विराट चषक १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
व्हिजन अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने विराग क्रिकेट अ‍ॅकॅडमीवर २७ धावांनी विजय मिळविला. दुसऱ्या उपांत्य लढतीत सागर कांबळे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने गायकवाड क्रिकेट अ‍ॅकॅडमीवर ३२ धावांनी मात केली.
संक्षिप्त धावफलक : व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी २० षटकांत ४ बाद १५० (स्वरदीप खेनट ३९, प्रताप जोरी ३८, प्रणव महाले २५, तेजस तलसनकर २/२५) वि. वि. विराग क्रिकेट अ‍ॅकॅडमी २० षटकांत ७ बाद १२३ (चिराग घाला ७२, स्वरदीप खेनट ३/२२, अमित चौरेकर २/१२), सामनावीर : स्वरदीप खेनट; सागर कांबळे क्रि केट अ‍ॅकॅडमी : मालुजी निगडे ७९, राज नवले ५५, शिवाजी दास २४ धावा, हर्षद शिर्के २/२५, यश शितोळे ३/२८) वि. वि. गायकवाड क्रिकेट अ‍ॅकॅडमी २० षटकांत ७ बाद १५२ (श्रीनिधी कुलकर्णी २१, हर्षद शिर्के ३५, प्रकाश प्रजापती २६, प्रतीक मोरे २३, अखिलेश गवळे : २/२२, दिनेश राजपूत ३/२१), सामनावीर : मालोजी निगडे.

Web Title: Vision, Kamble Academy in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.