पुणे महापालिकेला ६० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:00+5:302021-05-20T04:11:00+5:30
पुणे : कोरोना महामारीशी अवघे जग सामना करत आहे. भारतात विविध पातळ्यांवर हा लढा सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या आणि ...
पुणे : कोरोना महामारीशी अवघे जग सामना करत आहे. भारतात विविध पातळ्यांवर हा लढा सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या आणि वैद्यकीय संसाधने हा चिंतेचा विषय होत असताना, सेव्ह दि चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय संस्थेने पुणे शहरासाठी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना ६० आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी आयुक्त राजेश पाटील यांना १० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देऊन या कार्यात मोलाचा सहभाग नोंदवला आहे.
सेव्ह दि चिल्ड्रन-बाल रक्षा ही संस्था मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, मालेगाव, सिन्नर, इगतपुरी या भागांत बालकांशी निगडित अनेक प्रकल्प राबवत आहेत.
पुणे महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वाव्हरे, सेव्ह दि चिल्ड्रन संस्थेचे गोविंद बडम, अपर्णा जोशी, हरीश वैद्य, अमिताव बराक उपस्थित होते.
कोट
बालकांचे हक्क आणि अधिकार यासाठी सेव्ह दि चिल्ड्रन सातत्याने विविध स्तरांवर काम करत आली आहे. कोरोनाच्या या संकटकाळात संस्थेने मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. वैद्यकीय व्यवस्थेवर आणि संसाधनांवर ताण असताना संस्थेने ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देऊन खारीचा वाटा उचलला आहे. याही पुढे जे जे शक्य होईल ते-ते करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील.
- इप्सिता दास, सेव्ह दि चिल्ड्रन
फोटो : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर भेट देताना सेव्ह दि चिल्ड्रन संस्थेचे कार्यकर्ते.