डिंभे प्राथमिक आरोग्य केंद्रास सीओंची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:09 AM2021-03-27T04:09:34+5:302021-03-27T04:09:34+5:30

या वेळी आयुष प्रसाद यांनी लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला लस देण्यात यावी, लसीकरण करताना लसीचे वेस्टेजचे प्रमाण ...

Visit of CO to Dimbhe Primary Health Center | डिंभे प्राथमिक आरोग्य केंद्रास सीओंची भेट

डिंभे प्राथमिक आरोग्य केंद्रास सीओंची भेट

googlenewsNext

या वेळी आयुष प्रसाद यांनी लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला लस देण्यात यावी, लसीकरण करताना लसीचे वेस्टेजचे प्रमाण शून्य असले पाहिले, लसीकरणासाठी लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत जास्तीत जास्त पोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करावे तसेच पुढील दोन दिवसांत तालुक्यातील पाच हजार लाभार्थींना लस देण्यात यावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी ,अशा सूचना गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांना दिल्या.

आरोग्य केंद्रात चालू असलेल्या लसीकरणाबाबत व इतर कामकाजाबाबत डॉ. प्रशांत कुटे यांनी माहिती दिली. याप्रसंगी जनाताई उगले, आरोग्य सहायक दीपक गाडीलकर व भरत ननवरे उपस्थित होते.

डिंभे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणात मार्गदर्शन करताना आयुष प्रसाद.

Web Title: Visit of CO to Dimbhe Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.