जगातील मोठ्या घुमटाला नेपाळच्या शिष्टमंडळाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 01:45 AM2018-12-20T01:45:56+5:302018-12-20T01:46:19+5:30

नेपाळ येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व राजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वांत मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह व विश्वशांती ग्रंथालयाला भेट दिली

Visit of a Nepalese delegation to the world's largest canoe | जगातील मोठ्या घुमटाला नेपाळच्या शिष्टमंडळाची भेट

जगातील मोठ्या घुमटाला नेपाळच्या शिष्टमंडळाची भेट

googlenewsNext

कदमवाकवस्ती : धार्मिक व जातीय संतुलन एकत्रित करण्यासाठी सद्भावना व देशातील सर्व धर्मांतील लोकांना एकत्रित करण्यासाठी या अशा प्रकारच्या घुमटामुळे फार मोठा उपयोग होणार आहे. याचीच प्रेरणा घेऊन नेपाळमध्ये आम्हीपण अशा प्रकारचे कार्य करण्याचा प्रयत्न करू, असे उद्गार नेपाळच्या प्रदेश एकचे शिक्षण व आरोग्य, सांस्कृतिक, युवक कल्याण, सामाजिक न्याय महिला व बाल कल्याण मंत्री जीवन घिमिरे यांनी काढले.

नेपाळ येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व राजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वांत मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह व विश्वशांती ग्रंथालयाला भेट दिली. या वेळी कनकाई नगरपालिकेचे महापौर राजेंद्र पोखरेला यांच्यासह ८ सदस्यांचा समावेश होता. यामध्ये केबीए ऊर्जाचे एमडी दीपक छपगैरी, आयओसीचे मेंबर राजकुमार कोटले, कंकई वड्रो दोनचे परशुराम गिरे, येनोंगी मेंबर जीबन श्रेष्ठ, डमक एनपी टाक बहाद्दूर थापा व इंजिनिअर पवन गिमेरिया यांचा समावेश होता.
जीवन घिमिरे म्हणाले, ‘‘डॉ. कराड या एकाच व्यक्तीने जे उभे केले, ते त्यांचे मोठे योगदान आहे. याचे उदाहरण आम्ही घेतलेच पाहिजे. त्यांचे व्हिजन उत्तम आहे. सद्भाव, धार्मिक आणि सहिष्णुता यातून निर्माण होईल. नेपाळमध्ये एक मोठी नदी आहे. तेथे सर्व धर्मांसाठी एकत्रित असे स्फूर्तिस्थान उभे करण्याचा आमचा मानस आहे.’’
शेजारधर्म निभावताना डॉ. विश्वनाथ कराड यांनी यापूर्वी काठमांडू नगरपलिका हद्दीत भूकंपग्रस्तांसाठी ज्ञानेश्वर, तुकाराम व विवेकानंद यांच्या नावाने १२० घरे बांधून दिली आहेत.
तेथे आमचे राज्य सरकार काही विकासात्मक सुधारणा करणार आहे. त्या विकासकार्यासाठी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचे मोलाचे योगदान असावे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. या प्रसंगी शिष्टमंडळाला विश्वशांती केंद्राचे सल्लागार, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी विश्वशांती केंद्राच्या कार्याची माहिती दिली. तसेच, मिटसॉगचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पाडे यांनी डोमसंदभार्तील विस्तृत माहिती दिली. या वेळी पर्यावरण शांती सूरज गायकवाड, राजेंद्र रणभोर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

४कनकाई नगरपालिकेचे महापौर राजेंद्र पोखरेला म्हणाले, ‘‘डॉ. कराडांची दूरदृष्टी एकमेवाद्वितीय आहे. त्यांना देवाने एक विलक्षण शक्ती दिली आहे. म्हणूनच त्यांनी जगातले हे आठवे आश्चर्य उभे केले आहे.
४मानवता ही वास्तविक सर्वांत मोठी गोष्ट आहे. मानवतेची सेवा हे सर्वांत मोठे कार्य आहे. या अद्वितीय घुमटाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व मानवतेचा संदेश जगाला दिला जाईल.’’
४तसेच, त्यांनी डॉ. कराड यांना विनंती केली, की नेपाळ येथे उच्च तंत्रशिक्षण विद्यापीठ स्थापनेसाठी त्यांनी योग्य ते सहकार्य करावे.

Web Title: Visit of a Nepalese delegation to the world's largest canoe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे