तंत्रमंडळाच्या उपसचिवांची समर्थ संकुलास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:11 AM2020-12-06T04:11:20+5:302020-12-06T04:11:20+5:30
यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत समर्थ संकुलातील पॉलिटेक्निक व फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ...
यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत समर्थ संकुलातील पॉलिटेक्निक व फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार डॉ.बाजड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.वैभव आहेर, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले, इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्रा.संजय कंधारे आदी उपस्थित होते.
डॉ.सुधीर बाजड म्हणाले की, विद्यार्थ्यांना मिळालेले गुण याचं नक्कीच कौतुक करायला हवे पण त्याचबरोबर महत्वाचा घटक आहे. तो त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य ते आजमावून कौशल्याधिष्ठित कार्यप्रणाली आत्मसात करून जीवनात उत्कर्ष साधावा.
इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट संवाद वाढण्यासाठी व विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी आपल्या संस्थेने विविध औद्योगिक समूहांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणारे असून खऱ्या अर्थाने इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट सहयोग घडून आणलेला आहे. प्राचार्य अनिल कपिले यांनी अभार मानले.
--