‘विठाई ’मुळे होणार पंढरीचा प्रवास सुलभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:02 PM2018-07-24T16:02:45+5:302018-07-24T16:11:03+5:30

राज्यभरातून पंढरपुर येथे दररोज हजारो भाविक येत असतात.एकाच पॅकेजमध्ये ‘प्रवास, राहणे व जेवण’ या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल.

Vithai will make Pandhari's travel easy | ‘विठाई ’मुळे होणार पंढरीचा प्रवास सुलभ 

‘विठाई ’मुळे होणार पंढरीचा प्रवास सुलभ 

Next
ठळक मुद्देप्रासंगिक करार पध्दतीने सध्या जे भाडे आकारले जाते, त्या दरात ही सेवा पुरविली जाणार बससेवेचे ‘विठाई’ असे नामकरण करण्यात येणार

पुणे : विठुरायाच्या दर्शनाला राज्यभरातून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) कडून लवकरच नवीन बससेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेचे ‘विठाई’ असे नामकरण करण्यात येणार आहे. भाविकांच्या मागणीनुसार प्रासंगिक करार पध्दतीने ‘प्रवास, राहणे व जेवण’ या पॅकेजसह ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
पंढरपुर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त दहा लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. दररोज हजारो भाविकांची पावले पंढरीकडे वळतात. विठ्ठलभक्तांचा हा ओघ राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुरू असतो. अनेक भाविक परराज्यातूनही येतात. पंढरीत येण्यासाठी ठिकठिकाणाहून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक भाविक खासगी वाहनांने प्रवास करतात. पण अनेकदा त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मुक्काम, जेवणाची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने खास पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी ‘विठाई’ ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची ही संकल्पना आहे.
महामंडळातील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून पंढरपुर येथे दररोज हजारो भाविक येत असतात. अनेक भाविक खासगी वाहने करून येतात. या वाहनांकडून अवाजवी शुल्क आकारले जाते. अनेक भाविक गटा-गटाने येण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे एसटीने विठाई नावाने या भाविकांसाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना थेट त्यांच्या गावातून ही बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रासंगिक करार पध्दतीने सध्या जे भाडे आकारले जाते, त्या दरातही ही सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी भाविकांना आधीच गटा-गटाने नोंदणी करावी लागेल. खास या बसने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या राहणे व जेवणाची व्यवस्थाही एसटीकडूनच केली जाणार आहे. एकाच पॅकेजमध्ये ‘प्रवास, राहणे व जेवण’ या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल. त्यामुळे खासगी वाहनांकडून होणारी आर्थिक लुटही थांबेल. 

Web Title: Vithai will make Pandhari's travel easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.