विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 11:05 AM2022-07-05T11:05:45+5:302022-07-05T11:06:24+5:30

गेल्या दहा वर्षांपासून सर्जा सोपानकाकांचा पालखी रथ ओढत होता

Vitthal darshan remained incomplete Leaving Sopankaka palakhi chariot on his shoulder he left | विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव

विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव

googlenewsNext

सोमेश्वरनगर : संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील रथाला जुंपणाऱ्या सर्जा आणि राजा या बैलजोडीपैकी सर्जा या बैलाने आपला प्रवास निम्म्यावरच थांबवत आपले प्राण सोडले. गेल्या दहा वर्षांपासून सर्जा सोपानकाकांचा पालखी रथ ओढत होता. मात्र, यावर्षी विठ्ठलाला भेटायची त्याची इच्छा अपूर्णच राहिली.

 बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबियांना गेल्या १०० वर्षांपासून संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा रथ ओढणाऱ्या बैलांचा मान असतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोरटेवाडीच्या केंजळे वाड्यातून प्रसाद केंजळे, विकास केंजळे, नितीन कुलकर्णी, ज्ञानेश्वर केंजळे यांनी बैलांचे पूजन करून सर्जा आणि राजाला सासवडला पाठविले. सासवड येथून सोहळा सुरू झाल्यापासून कोऱ्हाळे मुक्काम उरकल्यानंतर सर्जा आजारी पडला. तरीही त्याने बारामतीत पालखी रथ ओढला. मात्र, बारामतीत गेल्यावर तो जास्तच आजारी पडला. दवाखाना केला तरी त्याला काही फरक नाही पडला आणि बारामती येथेच त्याने आपले प्राण सोडले. गेल्या १० वर्षांपासून संत सोपानकाकांच्या पालखीचा रथ ओढत विठ्ठलाच्या दर्शनाची सर्जाची ओढ अपूर्णच राहिली.

सर्जाने पालखी सोहळ्याला निम्म्यापर्यंतच साथ दिल्याने पालखी सोहळा थांबू नये म्हणून मानकरी केंजळे कुटुंबियांनी नवीन बैल खरेदी करत सोहळा चालू ठेवला असल्याची माहिती विकास केंजळे यांनी दिली.

Web Title: Vitthal darshan remained incomplete Leaving Sopankaka palakhi chariot on his shoulder he left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.