विठ्ठल हे मराठी माणसाच्या मनातील दैवत : माधव भंडारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:59 PM2018-04-17T12:59:01+5:302018-04-17T12:59:01+5:30

पंढरपुर व विठ्ठल यांच्या नामाचा उल्लेख इसवी सन ५३४  शिलालेखमध्ये उपलब्ध आहे. त्यावेळी पांडुरंग पलवी असे या गावाचे नाव होते.

Vitthal is the god of Marathi people : Madhav Bhandari | विठ्ठल हे मराठी माणसाच्या मनातील दैवत : माधव भंडारी 

विठ्ठल हे मराठी माणसाच्या मनातील दैवत : माधव भंडारी 

googlenewsNext
ठळक मुद्देपंढरपुर व विठ्ठल यांच्या नामाचा उल्लेख इसवी सन ५३४  

 लोणावळा : मराठी माणूस जगाच्या पाठीवर जिथे जिथे गेला तेथे विठ्ठलाला सोबत घेऊन गेला अशा या विठ्ठलाचा महिमा आषाढी एकादशीला पहायला मिळतो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत विठ्ठल नामाला व वारीला अनन्य साधारण महत्व आहे. विठ्ठल हे मराठी माणसाच्या मनातील दैवत असल्याचे मत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले. 
 भांगरवाडी येथील भोंडे हायस्कूलच्या प्रांगणात १६ व्या वसंत व्याख्यानमाला व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ' विठ्ठल एक सनातन कोडे' या विषयावर भंडारी यांनी लोणावळेकरांना मार्गदर्शन केले. यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, विद्या निकेतन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, वसंत व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष प्रशांत पुराणिक हे उपस्थित होते. भंडारी म्हणाले, किमान नऊशे ते साडेनऊशे वर्षांपासून वारीची परंपरा अखंडपणे सुरु आहे , अशा भक्तिपरंपरेचे हे जगातील एकमेव आश्चर्यकारक उदाहरण आहे. संत ज्ञानेश्वर हे या वैश्विक परंपरेचे आरंभ बिंदू असले तरी त्यांच्या पणजोबांपासून वारीची प्रथा होती. अनेक चढ-उतार व अडचणींवर मात करत ही वारी अखंडपणे आजदेखील सुरू आहे. निमंत्रणाचा मान अपमान नाही, गाजावाजा नाही असे असताना आषाढी एकादशीची तारीख जवळ येताच लाखों वारकरी पंढरीच्या दिशेने पायी चालु लागतात. असा हा वारीचा अगाध महिमा आहे. 
पंढरपुर व विठ्ठल यांच्या नामाचा उल्लेख इसवी सन ५३४  शिलालेखमध्ये उपलब्ध आहे. त्यावेळी पांडुरंग पलवी असे या गावाचे नाव होते. दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या स्कंदपुराणात प्रथम पंढरपुर व विठ्ठल या नामाचा उल्लेख सापडतो. तर साडेपाच हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या महाभारतात भीमा चंद्रभागेचा उल्लेख सापडतो. श्री विठ्ठल हे एकमेव दैवत आहे की ज्यांच्या हातात कसलेही शस्त्र नाही व त्यांना भक्तांकरीता युध्द देखील करावे लागले नाही. अशा प्रकारे श्री विठ्ठल उलगडून सांगताना  भंडारी यांनी महाभारत, स्कंदपुराण , ज्ञानेश्वरी व अन्य संशोधन साहित्याचा आधार घेत विविध दाखले दिले. 

Web Title: Vitthal is the god of Marathi people : Madhav Bhandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.