आषाढीनिमित्त विठ्ठल मंदिरे सजली
By admin | Published: July 27, 2015 03:33 AM2015-07-27T03:33:10+5:302015-07-27T03:33:10+5:30
आषाढी वारीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सोमवारी विविध कार्यक्रम होत आहेत. शहरातील विठ्ठल मंदिरे विद्युत रोषणाई तसेच
पुणे : आषाढी वारीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सोमवारी विविध कार्यक्रम होत आहेत. शहरातील विठ्ठल मंदिरे विद्युत रोषणाई तसेच फुलांनी सजली आहेत. विठ्ठल रुक्मिणीला विविध आभूषणे घालण्यात आली आहेत. प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील मंदिरात पुण्यासह परिसरातील भाविक आवर्जून हजेरी लावतात.
शहरात निवडुंग्या विठोबा, प्रासोड्या विठोबा, नवी पेठ विठ्ठल मंदिर, पालखी विठोबा मंदिरामध्ये रात्री १२ पासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. महापूजा, भजन, धूप आरती, काकडा आरती, हरिपाठ, फराळवाटप, कीर्तन, भजन, महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम दिवसभर चालू असणार आहेत. भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगाही तयार करण्यात आल्या आहेत. गर्दी होऊ नये, मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तही असणार आहे. सर्व मंदिरे पहाटेपासूनच भाविकांना दर्शनासाठी दिवसभर खुली असणार आहेत. (प्रतिनिधी)